Window 11 युजर्ससाठी GoodNews! आता अँड्रॉइड आणि ios प्रमाणे दरवर्षी मिळणार नवे अपडेट फिचर

गेल्या महिन्यात लॉन्च केलेला Windows 11नवीन यूजरफेस, अ‍ॅप आयकॉन आणि सेंट्रल प्लेस स्टार्ट मेनू बटणासह येतो. अशी अपेक्षा आहे की वर्षाच्या अखेरीस हे रोलआऊट करण्यात येणार आहे. हे नवीन पीसीवर प्री-इंस्टॉल स्वरूपात उपलब्ध आहे. Windows 10 युजर्सना Windows 11 मध्ये विनामूल्य अपग्रेड दिले जात आहे. हे सध्या चाचणीसाठी उपलब्ध असून मायक्रोसॉफ्ट 6 वर्षानंतर पुन्हा एकदा Windows 11 रोलआऊट करत आहे. आता मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्सना नवीन अपडेटसाठी वर्षानुवर्षे अधिक काळ थांबावं लागणार नाही. Window 11 युजर्ससाठी दरवर्षी नवीन अपडेट जाहीर केले जातील. Window 11साठी कंपनीने प्रमुख फीचर अपग्रेडची वार्षिक रोलआउटची घोषणा केली आहे. त्यामुळे Window 11 दरवर्षी नवीन अपडेट घेऊन युजर्ससाठी येणार आहेत.

Window 11 चे अपडेट्स लवकरच येणार

मायक्रोसॉफ्ट कंपनीने असे सांगितले आहे की, ते वार्षिक आधारावर Window 11 च्या फीचर अपडेट जाहीर करणार आहे. कंपनी दरवर्षी सहा महिन्यात Window 11 अपडेटचे वेळापत्रक तयार करेल. अशा परिस्थितीत युजर्सना दरवर्षी दोन मोठी अपडेट मिळणार आहे. तर Window 11 आणि Window 10 डिव्हाइस मासिक आधारावर सिक्युरिटी अपडेटच्या स्वरूपात क्वालिटी अपडेटने दिली जाणार आहे. तसेच कंपनीने असेही सांगितले की Home, Pro यूजर्सला Window 11 ला 24 महिन्यांसाठी सपोर्ट मिळणार आहे. Window 22 एंटरप्राइझ आणि एजुकेशन एडिशनसाठी 36 महिने उपलब्ध असणार आहे.

सिक्युरीटी अपडेट देण्यात येणार

Windows 10 ला सतत मासिक २०२५ पर्यंत Windows 10 सिक्युरीटी अपडेट देण्यात येणार आहे. जेव्हा हार्डवेअरचा प्रश्न येतो तेव्हा मायक्रोसॉफ्ट एएमडी, इंटेल आणि क्वालकॉम सारख्या सर्व प्रमुख सिलिकॉन भागीदारांसह काम करतो. Windows 11 साठी, लॅपटॉप 64-बिट x86 किंवा एआरएम प्रोसेसर सपोर्ट करणे आवश्यक आहे. हे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज पर्यायासह देण्यात येणार आहे. Windows 10 ला कमीतकमी 1 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेजची आवश्यकता असणार आहे. Windows 11 ला नवीन वॉलपेपर आणि अ‍ॅनिमेटेड इफेक्ट्स आणि नवीन साऊंड वितरणासह एक नवीन स्टार्च मेन्यू देण्यात येणार आहे.