दुकानातल्या वस्तू चोरून ऑनलाइन विकल्या; महिलेला २७ कोटींचा दंड ३ वर्षाचा तुरूंगवास

आत्तापर्यंत किमने ३.८ मिलियन डॉलरच्या वस्तू ऑनलाइन पद्धतीने विकल्या आहेत.

women shop lifting and selling online fine rs 27 crore and jailed for 23 years
दुकानातल्या वस्तू चोरून ऑनलाइन विकल्या; महिलेला २७ कोटींचा दंड ३ वर्षाचा तुरूंगवास

चोरीच्या अनेक घटना आपण रोज ऐकत असतो. दुकानातील वस्तू चोरी करणारे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. अमेरिकेतल्या एका महिलेने दुकानातील सामानाची चोरी केली. चोरी केल्यानंतर ती तिथेच शांबली नाही. चोरी केलेल्या वस्तू तिने ऑनलाइन विकायला सुरूवात केली. या संपूर्ण प्रकारात चोरीच्या आरोपाखाली महिलेला तब्बल २७ कोटी रूपयांचा दंड भरावा लागला.

किम रिचर्डसन असं या महिलेच नाव आहे. तिचं वय ६३ वर्ष आहे. हि महिला अमेरिकेच्या टेक्सास येथे राहते. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेने गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या दुकानांमधून चोरी केली आहे. २००० ते २०१९ पर्यंत अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात ती गेली होती. तिथल्या अनेक दुकानांमध्ये ती फिरायची. तिथे गेल्यावर ती तिथल्या वस्तू चोरी करायची.

अमेरिकेच्या वेगवेगळ्या दुकानांमधून चोरी केलेल्या वस्तू किम ऑनलाइन विकत होती. विशेष म्हणजे चोरी केलेल्या वस्तू किम घरी आणायची. त्या वस्तू पुन्हा पॅक करायची जेणेकरून लोकांना ती वस्तू नवीन वाटावी. गेली १९वर्ष किम हे काम करत होती. आत्तापर्यंत किमने ३.८ मिलियन डॉलरच्या वस्तू ऑनलाइन पद्धतीने विकल्या आहेत. भारतात याची किंमत २७ कोटी रूपये इतकी होते. या प्रकरणाचा संपूर्ण तपास एफबीआयने केला. आत्तापर्यत कमावलेली सगळी रक्कम किमला दंड म्हणून परत करायची आहे. तसेच तिला ३ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षाही करण्यात आली आहे.


हेहि वाचा – मुलाची सोशल मीडियावरील दादागिरी जीवावर बेतली; वडिलांची घरात घुसून हत्या