घरटेक-वेकVideo: श्वानांसाठी तयार केला जगातील पहिला स्मॉर्टफोन

Video: श्वानांसाठी तयार केला जगातील पहिला स्मॉर्टफोन

Subscribe

या डिवाइजच्या माध्यमातून कोणताही माणूस आपल्या श्वानासोबत बोलू शकतो.

स्मॉर्टफोन जगातील सर्व लोकांची गरज बनली आहे. माणूस तर मोबाईल शिवाय तासभर देखील राहू शकत नाही. माणूसच नाही तर आता प्राण्यांना सुद्धा स्मॉर्टफोनचे वेड आहे. सोशल मीडियावर अनेक प्राणी चक्क व्हिडिओ कॉलिंगवर बोलतात. ऐकून धक्का बसेल पण श्वान हे सर्वात जास्त वेळ व्हिडिओ कॉलिंगवर बोलण्यासाठी चर्चेत आहेत. पेटलवर्स डॉग्सना व्हिडिओ कॉलिंगवर बोलायला सर्वात जास्त आवडते. श्वानांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी एका स्मॉर्टफोन तयार करण्यात आला आहे. ज्यात ते त्यांच्या मालकांशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलतात.

वैज्ञानिकांनी श्वानांसाठी असे एक डिव्हाइज तयार केले आहे ज्यात श्वान त्यांच्या मालकांशी सहजरित्या बोलू शकतात. ते काय करत आहेत ते पाहू शकतात. त्याचप्रमाणे श्वानाचे मालक आपल्या श्वानावर योग्यरित्या लक्ष देखील ठेवू शकतात.

- Advertisement -

न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, वैज्ञानिकांनी एक प्रोटोपाइप डॉगफोन डिवाइज तयार केले आहे. हे डिवाइज एका बॉल सारखे दिसते जे कॅम्पुरटशी कनेक्ट असून हालचाली ओळखू शकते. या डिवाइजच्या माध्यमातून कोणताही माणूस आपल्या श्वानासोबत बोलू शकतो. डॉक्टर इलियेना यांनी या डिवाइजचा शोध लावला आहे. त्यांनी १० वर्षांच्या एका श्वानासाठी हे डिवाइज तयार केले.

ज्यांच्या घरी प्राणी असतात अशा लोकांना घराबाहेर पडताना आपल्या प्राण्यांची चिंता असते. त्यामुळे या डिवाइजमुळे घरी असलेल्या आपल्या प्राण्याची चिंता राहणार आहे. डिवाइजमुळे घरी असलेल्या प्राणी तुमच्या डोळ्यासमोर राहतील.

- Advertisement -

हेही वाचा – आता Instagramवर फेक अकाउंटना लागणार लगाम ; नव्या यूजर्सला सबमिट करावा लागणार व्हिडीओ सेल्फी 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -