घरटेक-वेकजगातील सर्वात स्वस्त Made in India इलेक्ट्रिक स्कूटर; मायलेज फक्त २० पैसे

जगातील सर्वात स्वस्त Made in India इलेक्ट्रिक स्कूटर; मायलेज फक्त २० पैसे

Subscribe

दिल्ली येथील भारतीय कंपनी डिटेल इंडियाने स्वस्त मोबाइल आणि स्वस्त LED टीव्ही बनविल्यानंतर आता स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली आहे. या स्कूटरचा मायलेज ऐकाल तर तुम्ही हैराण व्हाल. कारण या स्कूटरचा मायलेज अवघे २० पैसे प्रति किलोमीटर एवढा आहे. ही स्कूटर जगातील सर्वात स्वस्त स्कूटर असेल असा दावा कंपनीने केला आहे.

डिटेल कंपनीने या स्कूटरची किंमत १९ हजार ९९९ रुपये असेल असे सांगितले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन स्कूटर बुक करता येऊ शकते. या स्कूटरचे नाव Detel Easy आहे. सध्या ही स्कूटर तीन रंगामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पर्ल व्हाईट, मेटालिक रेड आणि जेट ब्लॅक कलर उपलब्ध आहेत. ऑटोमोबाईल तज्ज्ञांनुसार आतापर्यंत भारतात तरी एवढ्या स्वस्तातली स्कूटर आलेली नाही. डिटेल कंपनीच्या दाव्यानुसार या स्कूटरची किंमत तर कमी आहेच शिवाय ही गाडी चालवतानाही खिशाला फार कात्री लागणार नाही. अतिशय कमी खर्चामध्ये ही स्कूटर चालवता येणार आहे.

- Advertisement -

सर्वात खास आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही इलेक्ट्रिक बाइक चालविण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज लागणार नाही. तसेच कोणतेही रजिस्ट्रेशन देखील करावे लागणार नाही. ज्या लोकांना नित्यनियमाने कमी अंतराचा प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठी ही बाइक खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

ही आहेत वैशिष्टे

  • Detel Easy Electric Bike एकदा चार्ज केल्यानंतर ६० किलोमीटरचा प्रवास करता येतो.
  • वजनाने देखील ही स्कूटर अतिशय हलकी असून ५६ किलो एवढे वजन आहे.
  • स्कूटरचा टॉप स्पीड ही २५ किलोमीटर प्रति तास एवढी आहे. याची बॅटरी ७ ते ८ तासांत पुर्ण चार्ज होते.
  • बॅटरीला तीन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.
  • दोन लोक आरामात यावर प्रवास करु शकतात.
  • स्कूटरसोबत हेल्मेट मोफत मिळतेय
  • ऑनलाईन खरेदी केल्यानतंर २५०० डिलिव्हरी चार्ज द्यावा लागणार आहे.
Detel Easy Electric bike
Detel Easy Electric bike

Detel कंपनीने याआधी २९९ रुपयांमध्ये फिचर फोन आणि ३९९९ रुपयांत एलईडी टीवी लाँच केला होता. या कंपनीची स्थापना २०१७ मध्ये झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -