जगातील पहिला 18GB रॅमचा स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

World's first smartphone with 18GB RAM and 1TB storage launched
जगातील पहिला 18GB रॅमचा स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

स्मार्टफोन निर्मित कंपनी ZTE ने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन ZTE Axon 30 Ultra चे Aerospace Editionचे लाँच केले आहे. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 18GB रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनमध्ये तीन 64MPची कॅमेरा आणि एक टेलीफोटो लेंस दिली गेली आहे. एवढेच नाहीतर स्मार्टफोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट दिला गेला आहे.

ZTE Axon 30 Ultra Aerospace एडिशनचे फिचर्स

ZTE Axon 30 Ultra Aerospace एडिशनमध्ये 6.67 इंचाचा एफएचडी प्लस कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे, जो HDR 10+ सपोर्ट करते. याचे रिफ्रेश रेट 144Hz आहे. या फोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 888 प्रोसेसर असून 18GB रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे. हे डिव्हाईस लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.

कॅमेरा

ZTE Axon 30 Ultra Aerospace एडिशनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये तीन लेंस 64MPची आहे. तर यामध्ये एक 8MPची पेरिस्कोप टेलीफोटो लेंस दिली गेली आहे. याशिवाय युजर्सना स्मार्टफोन व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16MPचा कॅमेरा मिळेल.

बॅटरी आणि कनेक्टिव्हीटी

कंपनीने ZTE Axon 30 Ultra Aerospace एडिशनमध्ये 4600mAh बॅटरी दिली आहे. जे 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय डिव्हाईसमध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि युएसबी टाईप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळेल.

ZTE Axon 30 Ultra Aerospace एडिशनची किंमत

कंपनीने ZTE Axon 30 Ultra Aerospace एडिशनची किंमत ६,९९८ चीनी युआन (सुमारे ८१ हजार ९९८ रुपये) ठेवली आहे. परंतु हा डिव्हाईस विक्रीसाठी उपलब्ध झाला नाही. दरम्यान कंपनीने यापूर्वी या डिव्हाईसचे vanilla एडिशन लाँच केले होते. ज्याची किंमत ४,६९८ चीनी युआन म्हणजे सुमारे ५५ हजार ५३ रुपये ठेवली होती. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट दिले गेले होते.


हेही वाचा – Vodafone Idea चे प्रिपेड प्लॅन महागला ; ‘हे’ आहेत नवे दर