शाओमीची फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल लाँच; जाणून घ्या फिचर्स

इलेक्ट्रिक स्कूटरनंतर शाओमीने आता इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे.

electric bycyle

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना लोकांनी पसंती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ खूप वेगाने वाढत आहे. म्हणूनच की काय चीनची आघाडीची स्मार्टफोन निर्माता शिओमी कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मीती करायला लागलं आहे. स्वस्त स्मार्टफोनसह आशियाच्या बाजारपेठेत प्रवेश करणारी चिनी कंपनी आता इलेक्ट्रिक वाहन बनवत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरनंतर शाओमीने आता इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शाओमीच्या यूपिन क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मचा उपयोग बर्‍याच स्वस्त इलेक्ट्रिक सायकल्स लाँच करण्यासाठी केला जात आहे. प्रत्येक नवीन मॉडेलसह या बाईक्स लक्ष वेधून घेत आहेत. कंपनीने आता आपल्या यूपिन ब्रांडच्या अंतर्गत Himo Z16 (हिमो झेड १६) नवीन इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे.


हेही वाचा – फेसबुक मेसेंजर रूम्स लाँच; आता एकाचवेळी ५० जणांना करता येणार व्हिडिओ कॉल


Xiaomi Youpin HIMO Z16 (शाओमी यूपिन हिमो झेड १६) तयार करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम धातूचा वापर केला गेला आहे आणि या सायकलच्या मागील बाजूस स्विंगआर्म (swingarm) सस्पेंशन देण्यात आलं आहे. हे सस्पेंशन सामान्यत: माउंटन बाइक्स, मोपेड्स आणि मोटारसायकलींमध्ये आढळतं. शिवाय, Xiaomi Youpin HIMO Z16 इलेक्ट्रिक सायकलचे वजन फक्त २२.५ किलो आहे. यात १६ इंचाची चाके आहेत आणि ही सायकल जास्तीत जास्त १०० किलो भार वाहू शकते.

Xiaomi Youpin HIMO Z16 इलेक्ट्रिक सायकल फोल्डेबल आहे. म्हणजेच ती सहजपणे दुमडली जाऊ शकते. सायकल तीन वेगवेगळ्या ठिकाणी दुमडली जाऊ शकते – हँडलबार, मध्यम फ्रेम, पेडल. त्यामध्ये मॅग्नेटिक क्लॅप्स आहेत जे सायकल जोडल्यावर पूर्णपणे चिकटल्या जातात, ज्यामुळे ती सहजतेने कुठेही घेऊन जाता येईल.

राईडिंग मोड आणि वेग

Xiaomi Youpin HIMO Z16 या इलेक्ट्रिक सायकलमध्ये तीन राइडिंग मोड आहेत. इलेक्ट्रिक पॉवर, पॉवर असिस्टेड आणि मॅन-पॉवर या तीन पद्धती आहेत. इलेक्ट्रिक मोडमध्ये ५५ किलोमीटरपर्यंत चालते आणि पॉवर मोडमध्ये ८० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. या सायकलचा वेग ताशी २५ किमी आहे.

वैशिष्ट्ये

Xiaomi Youpin HIMO Z16 मध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये एचडी एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे. हे एलसीडी IPX7 लेव्हलचे आहे जे पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. सायकलच्या स्क्रीनमध्ये आपण गती, उर्जा, रायडिंग आणि मायलेज यासारखी माहिती पाहू शकाल. याशिवाय सायकलमध्ये काही दोष असल्यास ते देखील दिसेल. ड्युअल डिस्क ब्रेक आणि उच्च प्रतिरोधक चाकं देण्यात आली आहेत, जेणेकरुन सायकल घसरणार नाही. यासह या सायकलच्या मुख्य बीममध्ये बॅटरी लपवलेली आहे. यामुळे चारीला जाण्याची भीती नाही. बॅटरी सहजपणे चार्ज केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, त्यात अँटी थेफ्ट लॉक आहे जेणेकरून बॅटरी चोरीला जाऊ शकत नाही.

किंमत

Xiaomi Youpin HIMO Z16 इलेक्ट्रिक सायकलची किंमत $ ३५० आहे (सुमारे २७ हजार रुपये). ही सध्या चीनमध्ये उपलब्ध आहे.