Mi TV 5G Series: शाओमीने लाँच केले तीन दमदार टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Xiaomi launches Mi TV 5X series in India
Mi TV 5G Series: शाओमीने लाँच केले तीन दमदार टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

शाओमी कंपनीने आज, गुरुवारी Mi TV 5X सीरिजचे तीन दमदार स्मार्टटीव्ही लाँच केले आहेत. हे तीन टीव्ही ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंच स्क्रीन साईजमध्ये येतील. या सर्व मॉडेलमध्ये 4K रेझोल्यूशन डिस्प्ले आणि एक ड्यूल साऊंड सिस्टम सपोर्ट मिळेल. Mi TV 5x चा ४३ इंच मॉडेल भारतात ३१ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळेल. तर ५० इंचच्या मॉडेलची किंमत ४१ हजार ९९९ रुपये असेल. तसेच ५५ इंच स्क्रीनवाला स्मार्टटीव्ही ४७ हजार ९९९ रुपयांत येईल. Mi TV 5X सीरिजचे स्मार्टटीव्ही लाँच ऑफरद्वारे HDFC बँक क्रेडिट कार्डहून खरेदी केल्यावर ३ हजार रुपयांची सूट मिळेल. शिवाय या टीव्ही EMIवर सहजरित्या घेऊ शकालं.

फिचर्स

Mi TV 5X सीरिजच्या तीन स्मार्टटीव्हीच्या मॉडेलमध्ये 4k रेझोल्यूशनचा सपोर्ट दिला गेला आहे. जो 3840 X 2160 पिक्सल आहे. स्मार्टटीव्हीमध्ये HDR10+ आणि Doly Vision सपोर्ट दिला गेला आहे. ४३ इंच आणि ५० इंच स्मार्टटीव्हीचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो ९६ टक्के आहे. तर ५५ इंच स्मार्टटीव्हीमध्ये ९६.६ टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो दिला गेला आहे. Mi TV 5x एक 64-bit quad core A55 CPU पॉवर्ड स्मार्टटीव्ही आहे, ज्यामध्ये Mali G52 MP2 सपोर्ट मिळेल. या स्मार्टटीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे. तसेच या स्मार्टटीव्हीमध्ये हँड्स फ्री गूगल असिस्टंट सपोर्ट दिला गेला आहे.

शाओमीच्या दमदार स्मार्टटीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3x HDMI 2.1, 2x USB, Ethernet, 1x optical, 1x 3.5mm, AV input आणि H.265 दिला गेला आहे. लेटेस्ट सीरिजला एका ड्यूल स्पीकर सेटअपसोबत लाँच केले आहे. शिवाय Dolby Atmos आणि DTS-HD यांचा सपोर्ट दिला गेला आहे. ४३ इंचाच्या स्मार्टटीव्हीमध्ये 30W स्टीरियो स्पीकर्स दिले आहेत. तर ५० इंच आणि ५५ इंचवाल्या स्मार्टटीव्हीमध्ये 40W स्टीरियो स्पीकर दिले गेले आहेत. यामध्ये एक नवे व्हर्जनवाले PatchWall UI दिले आहे, ज्यात smart recommendations, kids मोड आणि पॅरेंटल लूक, युनिव्हर्सल सर्च आणि ५५हून जास्त लाईव्ह चॅनल, ऑल न्यूज IMDb इटीग्रेशनचे सपोर्ट दिले गेले आहे.


हेही वाचा – लवकरच Facebook वरून करता येणार व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग!