घरटेक-वेकशाओमीचा Mi 10 Youth Edition 5G स्मार्टफोन लाँच

शाओमीचा Mi 10 Youth Edition 5G स्मार्टफोन लाँच

Subscribe

शाओमी या स्मार्टफोन कंपनीने Xiaomi Mi 10 Youth Edition 5G हा स्मार्टफोन चिनमध्ये लाँच केला आहे. Mi 10 Youth Edition 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर, ड्युअल-मोड सस्पेंशन लिक्विड कूलिंग आणि मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनची बॅटरी 4,160 mAh आहे

Mi 10 Youth Edition 5G ची किंमत

Mi 10 Youth Edition 5G ची किंमत CNY 2,099 (सुमारे २२,५०० रुपये) पासून सुरू होते. ही किंमत 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेलची आहे. 6 जीबी + 128 जीबी मॉडेल CNY 2,299 (सुमारे २४,७०० रुपये), 8 जीबी + 128 जीबी मॉडेल CNY 2,499 (सुमारे २६,९०० रुपये) एवढी किंमत आहे. तर 8 जीबी + 256 जीबी मॉडेल CNY 2,799 (सुमारे ३०,१०० रुपये) एवढी किंमत आहे. Mi 10 Youth Edition 5G स्मार्टफोन काळ्या, ब्लूबेरी मिंट, फोर सीझन स्प्रिंग मिल्क ग्रीन, पीस ग्रेपफ्रूट आणि व्हाइट पीच कलरमध्ये उपलब्ध आहे.

- Advertisement -

हेही वाचा – घरबसल्या पाच हजारात बुक करा Mahindra XUV500 आणि स्कॉर्पियो


Mi 10 Youth Edition 5G ची वैशिष्ट्ये

Mi 10 Youth Edition 5G ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. हे अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर चालतो. यात 180 htz टच सॅम्पलिंग रेटसह 6.57 इंचाचा फुल-एचडी + (1080×2400 पिक्सेल) डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765G 5 जी ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी अ‍ॅड्रेनो 620 GPU आहे. Mi 10 Youth Edition 5G या फोनमध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर १६ मेगापिक्सलचा सेल्फि कॅमेरा देण्यात आला आहे. यासह 4,160 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -