घरटेक-वेकजबरदस्त! ८ मिनिटांत बॅटरी होणार १०० टक्के, जाणून घ्या शाओमीच्या 'या' स्मार्टफोनबद्दल

जबरदस्त! ८ मिनिटांत बॅटरी होणार १०० टक्के, जाणून घ्या शाओमीच्या ‘या’ स्मार्टफोनबद्दल

Subscribe

काही महिन्यांपूर्वी शाओमीने (Xiaomi) २०० वॉट वायर्ड चार्जिंग आणि १२० वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी बाजारात आणली होती. कंपनीने या टेक्नोलॉजीला हायपरचार्ज फास्ट चार्जिंग असे नाव दिले होते. दरम्यान कंपनी भविष्यात येणाऱ्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये या फीचरचा वापर करेल, अशी आशा होती. आता रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, जून २०२२मध्ये शाओमी हायपरचार्ज टेक्नोलॉजीचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनाला सुरुवात करणार आहे.

MyDriversच्या माहितीनुसार, ही टेक्नोलॉजी पुढील वर्षी येणाऱ्या Xiaomi Mi MIX 5 या स्मार्टफानमध्ये असू शकते. म्हणजे २०२२मध्ये येणाऱ्या शाओमी मी मीक्स ५ कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन असेल, ज्याला 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. यामध्ये १२० वॉट फास्ट वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली जाणार नाही. या ऐवजी फोनमध्ये ५० वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.

- Advertisement -

८ मिनिटांत होणार फूल चार्ज

माहितीनुसार, शाओमी HyperCharge 200W वायर्ड चार्जिंग सॉल्यूशनच्या 4000mAhची बॅटरीला ५० टक्के चार्ज करण्यासाठी ३ मिनिटे लागतील. त्यामुळे कंपनीने दावा केला आहे की, या बॅटरीला १०० टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी फक्त ८ मिनिटांचा वेळ लागेल. तर १२० वॉट वायरलेस फास्ट चार्जिंगच्या माध्यमातून 4000mAh बॅटरीला १० टक्के चार्जिंग केवळ १ मिनिटात होऊ शकते. तर ७ मिनिटांत ५० टक्के आणि १५ मिनिटांत १०० टक्के चार्चिंग होईल.

अलीकडेच लाँच झालेल्या शाओमी मी मिक्स ४ स्मार्टफोनमध्ये १२० वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी दिली गेली आहे. जी गेल्या वर्षी Mi 10 अल्ट्रासोबत लाँच केली होती. सध्या उपलब्ध असलेला हा सर्वात वेगवान चार्जिंग होणार स्मार्टफोन आहे. ही टेक्नोलॉजी असलेल्या या स्मार्टफोनच्या 4,500mAh बॅटरीला साधारणपणे २१ मिनिटांत आणि बूस्टमोडमध्ये १५ मिनिटांत फूल चार्ज होते.

- Advertisement -

हेही वाचा – Google New Rules: तुमचे वय १८ पेक्षा कमी आहे, तर जाणून घ्या इंटरनेट वापराचे नवे नियम


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -