घरटेक-वेकखुशखबर! Xiaomi चे दमदार Mi Watch Revolve स्मार्टवॉच झाले स्वस्त: जाणून घ्या...

खुशखबर! Xiaomi चे दमदार Mi Watch Revolve स्मार्टवॉच झाले स्वस्त: जाणून घ्या नवीन किंमत

Subscribe

चीनची लोकप्रिय टेक्नोलॉजी कंपनी शाओमीने (Xiaomi) आपले दमदार स्मार्टवॉच Mi Watch Revolve च्या किंमतीत घट केली आहे. त्यामुळे आता ग्राहक हे दमदार स्मार्टवॉच कमी किंमतीत खरेदी करू शकतात. शाओमीच्या या स्मार्टवॉचमध्ये १० स्पोर्टस् मोड दिले गेले आहेत. ज्यामध्ये रनिंग, सायकलिंग आणि वॉकिंग सारख्या अॅक्टिव्हीटीचा समावेश आहे. शिवाय स्मार्टवॉचमध्ये ग्राहकांना पावरफूल बॅटरी मिळेल, जे सिंगल चार्जमध्ये सात दिवसांचा बॅकअप देईल.

शाओमीच्या माहितीनुसार, Mi Watch Revolve स्मार्टवॉचची किंमतीत २००० रुपयांनी कमी केली आहे. आता हे स्मार्टवॉच ग्राहकांसाठी अॅमेझोन इंडिया आणि कंपनी वेबसाईटवर ७ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच मिडनाईड ब्लॅक आणि क्रोम सिल्वर कलर ऑप्शनमध्ये खरेदी केले जाऊ शकते. शाओमीचे हे स्मार्टवॉच गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केले गेले होते.

- Advertisement -

फिचर्स

Mi Watch Revolve स्मार्टवॉचमध्ये १.३९ इंच एमोलेड राऊंड डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन ४५४ x ४५४ पिक्सल आणि स्मार्टवॉचच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चा वापर केला गेला आहे. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये १० स्पोर्टस् मोड असून यामध्ये रनिंग, सायकलिंग आणि वॉकिंग सारख्या अॅक्टिव्हिटीचा समावेश आहे. तसेच रिवॉल्व स्मार्टवॉच हार्ट रेट आणि शरीराच्या उर्जेची मॉनिटर करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टवॉचमध्ये ११२ वॉच फेस दिले गेले आहेत. तर हे स्मार्टवॉच लेटेस्ट अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.

- Advertisement -

Mi Watch Revolve स्मार्टवॉचला 5ATM सर्टिफिकेशन मिळाले आहे. याचा अर्थ हे वॉटर आणि इस्ट प्रुफ आहे. शिवाय स्मार्टवॉचमध्ये 420mAh बॅटरी दिली गेली आहे. याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १४ दिवस बॅकअप देते, असा दावा केला आहे. शिवाय या स्मार्टवॉचमध्ये कॉल-मॅसेज नोटिफिकेशनसारखे लेटेस्ट फीचर्स देखील मिळतील.

दरम्यान शाओमी उद्या, २२ जूनला Mi Watch Revolve चे अपग्रेडेड व्हर्जन Mi Watch Revolve Active लाँच करणार आहे. या आगामी स्मार्टवॉचसंबंधित अनेक रिपोट्रर्स लीक झाले आहेत. यामध्ये लीक रिपोट्सच्या मते, या नव्या स्मार्टवॉच व्हर्जनमध्ये VO2 Max, बॉडी एनर्जी मॉनिटर, HR मॉनिटरचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये योगा, सायकलिंग, स्ट्रेचिंग, वेटलिफ्टिंगसारखे मोड मिळू शकतात.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -