घरटेक-वेकशाओमीचा रेडमी नोट ६ बाजारात दाखल

शाओमीचा रेडमी नोट ६ बाजारात दाखल

Subscribe

शाओमीचा रेडमी नोटच्या सिरीजमध्ये 'रेडमी नोट ६ प्रो' नुकताच चीनमध्ये लाँच केला गेला असून, आता तो लवकरच भारतात दाखल होणार आहे.

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड असलेल्या शाओमीचा रेडमी नोटच्या सिरीजमध्ये ‘रेडमी नोट ६ प्रो’ नुकताच चीनमध्ये लाँच केला गेला. आता लवकरच तो भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्याच वर्षी बाजारात आलेल्या शाओमीच्या रेडमी नोट ५ प्रो या फोनला भारतीय ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे हा फोन देखील मोबाईल युजर्सचे आकर्षण ठरणार आहे.

Redmi-6-Pro
(फोटो प्रातिनिधिक आहे)

कमी किंमत आणि भन्नाट फीचर्स

शाओमीच्या फोन्सची खासियत म्हणजे कमी किंमतीत आणि भन्नाट फीचर्स मिळतात. आपली हीच खासियत त्यांनी रेडमी ६ प्रो मध्ये सुद्धा कायम ठेवली आहे. आयफोन १० असणारा ‘नॉच‘ हे रेडमी नोट ६ प्रो चे मुख्य वैशिष्ट्य असून त्याचसोबत ५.८४ इंच डिस्प्लेसोबत १९:९ (पूर्ण एचडी स्क्रीन) रेशो, ड्युअल रिअर कॅमेरा (१२ आणि ५ मेगापिक्सल), ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ६२५ ऑक्टाकोर प्रोसेसर, ४ हजार एमएच बॅटरी, डेडीकेटेड सिम स्लॉट, मेमरी कार्ड (२५६ जीबी पर्यंत) अशी या मोबाईलची मुख्य फीचर्स आहेत.

- Advertisement -
Xiaomi Redmi Note 6 Pro
(फोटोग प्रातिनिधिक आहे)

विवध रंगात उपलब्ध

शाओमीने चीनमध्ये रेडमी नोट ६ प्रोचे दोन प्रकार लाँच केले आहेत. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल अशा दोन मॉडेलची किंमत अनुक्रमे १० हजार ४०० आणि १३ हजार ६०९ आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू, गोल्ड, रेड, पिंक या रंगातही उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -