Xiaomi Mi Mix 4: 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट, जबरदस्त कॅमेरा असणारा स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोन विक्रेता कंपनी Xiaomi आगामी काळात Mi Mix 4 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याची अनेक फीचर्स समोर आली आहेत. Xiaomi Mix Series च्या आगामी स्मार्टफोन Mi Mix 4 मध्ये 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी 120 वॉट वायर्ड आणि 80 वॉट वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. यासोबतच सेल्फीसाठी अंडर डिस्प्ले कॅमेर्‍यासह अनेक खास फीचर्स Mi Mix 4 मध्ये युजर्सना देण्यात येणार आहे. Xiaomi Mix Series च्या स्मार्टफोनची सर्वात खास फीचर्स म्हणजे या स्मार्टफोनला मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.

सर्टिफिकेशन साइट्सवरून लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Mi Mix 4, Xiaomi Mix Seriesचा फोर्थ जेनरेशन मॉडेलमध्ये 6.8 इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून ज्याची स्क्रीन रेझोल्यूशन फुल एडी प्लस असणार आहे. हा फोन 120 हर्ट्झच्या डिस्प्ले रीफ्रेश रेटसह देण्यात आला असून असा विश्वास आहे की, हे अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 सह लाँच केले जाणार आहे. यासह सर्वात पावर फूल Qualcomm Snapdragon 888 चिपसेट युजर्सना मिळणार आहे.

Mi Mix 4 मध्ये उत्कृष्ट कॅमेरा ग्राहकांना देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Xiaomi Mix Series च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये Sony IMX766 सेन्सरसह 50-मेगापिक्सलचे प्राइमरी लेन्स असणार आहे. यासह, 48 मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेन्सर असून जो अल्ट्रावाइड फीचर्सने सुसज्ज असणार आहे. Mi Mix मधील तिसरा मागील कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा असून जो 5x ऑप्टिकल झूमसह एक टेलीफोटो लेन्स असणार आहे. या फोनमध्ये 120x हायब्रीड झूम, 15x व्हिडिओ झूम, 1920fps स्लो मोशन व्हिडिओ शूटिंग आणि 8K रेझोल्यूशन व्हिडिओ शूटिंग सपोर्टसह बरीच खास फीचर्स असणार आहेत.