घरटेक-वेकXiaomi चा सर्वात स्वस्त फोन १९ मार्चला होणार लॉंच

Xiaomi चा सर्वात स्वस्त फोन १९ मार्चला होणार लॉंच

Subscribe

पुढच्या आठवड्यात Xiaomi चा सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन रिलायंन्स जिओच्या फोनला आव्हान देणारा ठरणार आहे.

ग्राहक शाओमी स्मार्ट फोनला चांगलीच पसंती देत आहेत. त्यामुळे कंपनी आता पर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन भारतीय बाजारापेठेत आणत आहे. १९ मार्चला हा फोन लॉंच होत असून या स्मार्ट फोनची किंमत केवळ चार हजार असणार आहे. त्यामुळे हा फोन रिलायंन्स जिओच्या फोनला टक्कर देणारा ठरणार आहे. रिलायंन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्राहकांना परवडतील अशा किंमतीत मोबाईल फोन बाजारात आणले. तसेच या फोन सोबत मोफत मोबाईल डेटाच्या ऑफर देखील त्यांच्या कडून देण्यात आल्या होत्या. तसाच काहिसा फंडा वापरत शाओमीने ग्राहकांना खुश करण्यासाठी सध्याच्या घडीला बाजारातील सर्वात कमी किंमतीचा स्मार्टफोन Xiaomi Redmi Go फोन बाजारात आणत आहे.

दीड वर्षाची वॉरंटी ?

साधारण काही मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना मोबाईल घेतल्यावर एक वर्षाच्या वॅारंटीची ऑफर देते. मात्र शाओमी आगामी फोनवर साधारण दीड वर्षा पर्यंतची मोबाईल वॉरंटी ग्राहकांना देणार आहे. शाओमी कंपनीचा हा अत्तापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन असणार आहे. याआधी शाओमी रेडमी ७ आणि रेडमी ७ प्रो मोबालफोनच्या सेलला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली होती. अवघ्या दोन मिनिटांमध्येच रेडमी ७ चे दोन लाखां पेक्षा अधिक हॅंडसेट विकले गेल्याची माहिती कंपनीने दिली होती. त्यामुळ १९ तारखेला येणाऱ्या या फोनमध्ये वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

- Advertisement -

Xiaomi Redmi Go फिचर्स

‘शाओमीचा रेडमी गो’ चीनमध्ये पहिल्यांदा लॉंच करण्यात आला आहे. तोच फोन आता लवकरच भारतात लॉंच केला जाणार आहे.
१) १ जीबी इतका या फोन चा रॅम असणार आहे.
२) या फोनचा इंटरनल स्टोरेज ८ जीबी तर ४२३ स्नॅपड्रैगन प्रोसेसर असणार आहे.
३) फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल तर बॅक कॅमेरा ८ मेगापिक्सल असणार आहे.
४) हा रेडमीचा आत्तापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. त्याची किंमत साधारण ४ हजारा पर्यंत असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -