घरटेक-वेकहरवलेला फोन आता स्मार्ट बँड शोधणार!

हरवलेला फोन आता स्मार्ट बँड शोधणार!

Subscribe

Mi Band HRX बँडचे अपग्रेडेड व्हर्जन

Xiaomi कंपनीने एमआय स्मार्ट बँड (Mi Smart band 3i) लाँच केले आहे. हा बँड Mi Band HRX चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. रोज तुम्ही किती चाललात ते हा बँड तुम्हाला सांगतो. एवढेच नाही तर तुमची किती कॅलरी बर्न झाली याची आकडेवारी अचूकरित्या हा बँड सांगतो. या बँडची किंमत १ हजार २९९ रूपये आहे.

असे करू शकता स्मार्ट बँड ऑर्डर

Mi.com वर या स्मार्ट बँडची प्री ऑर्डर तुम्ही करू शकता. कंपनीकडून असे सांगण्यात येत आहे की, हा बँड विशेष भारतासाठी तयार करण्यात आला आहे. बँडला AMOLED टच डिस्प्ले असून याची २० दिवस पुरेल इतकी बॅटरी आहे. इतकेच नाही तर हा बँड वॉटर रेज़िस्टेंट देखील आहे. यामुळे पावसात आणि स्विमिंग करताना या बँडला काढण्याची आवश्यकता नाही.

- Advertisement -

 

- Advertisement -

Mi Smart band 3i या बँडची तुलना Mi Band HRX शी केल्यास हा नवा बँड त्याचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यामध्ये ‘Find Device’ या पर्याय असल्याने तुमचा फोन तुम्हाला सहज शोधता येणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमचा फोन पेअर करणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही तुमचा फोनही हँडल करू शकतात. या बँडमुळे कॉल रिजेक्ट करणं, फोन अनलॉक करणं सोपं होणार आहे. येणाऱ्या तीन दिवसांचे हवामान देखील या बँडमुळे कळंण सहज सोपं होणार आहे.

असे आहेत फीचर

  • या स्मार्ट बँडचे वजन ३८.२ ग्रॅम आहे
  • अॅन्ड्रॉईड आणि आईओएस (iOS) या दोन्ही फोनला कनेक्ट करण्यासाठी ४.२ ब्लूटूथ असणं आवश्यक आहे
  • एखाद्या इव्हेंटच्या आठवणीसाठी रिमाइंडर देण्याचे काम देखील हे बँड करते
  • हा बँड Mi Band 3 सारखा असला तरी यामध्ये हार्ट सेन्सर नसेल
  • Mi Band HRX बँडचे अपग्रेडेड व्हर्जन

आता ट्विटरवर शेड्यूल करता येणार पोस्ट; असं असेल नवं फीचर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -