घरटेक-वेकभारतीय बाजारात आला शाओमीचा Poco F1

भारतीय बाजारात आला शाओमीचा Poco F1

Subscribe

शाओमीनं पोको सिरीजमधील Poco F1 लाँच केला. या फोनचे ३ व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत. २९ ऑगस्ट रोजी या फोनची वेबसाईटवरून विक्री होणार आहे.

भारतीय बाजारात शाओमीनं पोको सिरीजमधील Poco F1 लाँच केला आहे. या नव्या फोनमध्ये क्वालकॉम्स फ्लॅगशिपच्या स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय लिक्विडकूल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या टेक्नॉलॉजीमुळं जास्तीत जास्त वेळ फोनचा वापर करता येऊ शकतो. शिवाय हा फोन गरमदेखील होत नाही. या फोनमध्ये तीन रंग मिळणार असून ग्रेफाईट ब्लॅक, स्टील ब्ल्यू आणि रोझो रेड हे वेगळे रंग उपलब्ध असतील. दरम्यान या फोनचं स्पेशन एडिशनदेखील लाँच करण्यात आलं आहे. या एडिशनमध्ये केवळ अरामिड फायबरचा वापर करण्यात आला आहे. स्क्रॅचपासून बचावाकरिता याचा वापर करण्यात आला आहे. कारण अरामिड फायबरचा उपयोग बुलेटप्रुफ लाईफ जॅकेटप्रमाणं करता येतो.

काय आहे किंमत?

या फोनचे ३ व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत. यामधील ६ जीबी रॅम, अंतर्गत मेमरी ६४ जीबी असणाऱ्या फोनची किंमत २०,९९९ इतकी आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२ जीबी अंतर्गत मेमरी असणऱ्या फोनची किंमत २३,९९९ इतकी आहे. दरम्यान ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी अंतर्गत मेमरी असणाऱ्या फोनची किंमत ही २८,९९९ इतकी असणार आहे. तर ८ जीबी रॅम आणि अंतर्गत मेमरी २५६ जीबी असणाऱ्या आर्मर्ड एडिशन (स्पेशल एडिशन) ची किंमत २९,९९९ इतकी आहे. दरम्यान हा फोन घेण्यासाठी फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या वेबसाईटवर २९ ऑगस्ट रोजी सेल करण्यात येणार आहे.

- Advertisement -

शाओमी Poco F1 चं स्पेसिफिकेशन काय आहे?

Poco F1 चं वैशिष्ट्य हे त्याचं प्रोसेसर आहे. यामध्ये क्वालकॉम्स २.८ गीगीहर्ट्झ १० एनएन फिनफेटच्या स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसंच अँड्रीनो ६३० ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (जीपीयु) चा वापर केला आहे. तर ६.१८ इंचाची फुल एचडी स्क्रीन असून याचं रिझॉल्युशन २३४० x १०८० पिक्सल आहे. तर आस्पेक्ट रेशो १९:९ आहे. दरम्यान सेल्फीप्रेमींसाठी यामध्ये २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे तर याच्या सेन्सरमध्ये ब्युटीफिकेशन फीचरचा वापर केला आहे. रिअरमध्ये ड्युएल कॅमेरा असून प्रायमरी १२ मेगापिक्सलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे, तर प्रायमरी कॅमेरामध्ये सोनी IMX363 चा वापर करण्यात आला आहे. एकावेळी २०६ सीन कॅप्चर हा करता येतील. प्रत्येक तीन महिन्यानंतर हा फोन अपडेट होत राहील. यामध्ये साऊंड देण्यात आला आहे. बॅटरी ४००० एमएएच असून साधारण पूर्ण चार्ज झाल्यानंतर ८ तासापर्यंत यावर गेम खेळता येऊ शकतो. तर या फोनचं चार्जिंग हे जलद करता येणार आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये 4G+ ड्युएल LTE, ड्युएल Wi-Fi 802.11, Wi-Fi Direct, Bluetooth 5.0, USB Type-C पोर्ट लावू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -