घरटेक-वेकYouTube वरही आता 'हॅशटॅग' ट्रेंड

YouTube वरही आता ‘हॅशटॅग’ ट्रेंड

Subscribe

सुरुवातीला युट्यूब केवळ ३ हॅशटॅग वापरायचीच परवानगी देणार असून, तुम्ही व्हिडिओच्या खाली आणि वर दोन्हीकडे ते वापरु शकता. 

युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन तो व्हायरल करणं याचा ट्रेंड सध्या वाढतो आहे. केवळ युट्यूबमुळे जगभरात व्हायरल झालेले अनेक ‘स्टार्स’ तुम्हालाही माहित असतील. तरुणवर्गामध्ये अधिक लोकप्रिय असलेलं युट्यूब आता लवकरच युजर्ससाठी एक नवीन फिचर अॅड करणार आहे. युटयूब अपलोडर्सना व्हिडीओ अपलोड करतेवेळी टायटल आणि डिस्क्रीप्शनमध्ये ‘हॅशटॅग’ (#) टाकण्याची परवानगी देणार आहे. ‘हॅशटॅग’च्या वापरामुळे युजर्सना व्हिडिओ शोधणं अधिक सोपं जाईल, असं युट्यूबचं म्हणणं आहे. फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामच्या पाठोपाठ आता युट्यूबनेही हॅशटॅगचा वापर सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सोशल मीडिया युजर्सकडून या निर्णयाचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे हॅशटॅगची सुविधा नसल्यामुळे वरील तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत युट्यूब मागे पडत होते आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

अशाप्रकारे होणार # चा उपयोग

युजर्सना त्यांचा व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता यावा, यासाठी युट्यूब हे हॅशटॅग फिचर देणार आहे. एखाद्या हॅशटॅगमध्ये टाकलेले जास्तीत जास्त शब्द लोक जेव्हा युट्यूबवर जाऊन सर्च करतील, तेव्हा तो व्हिडीओ लगेचच त्यांच्यासाठी ओपन येईल. याशियाव याचा दुसरा फायदा म्हणजे # मध्ये टाकलेला एखादा शब्द तुम्ही युट्यूब विंडोमध्ये टाईप कराल, तेव्हा त्या शब्दाने टॅग करण्यात आलेले अन्य सर्व व्हिडीओ तुमच्यासाठी होम पेजवर येतील. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, सुरुवातीला युट्यूब केवळ ३ हॅशटॅग वापरायचीच परवानगी देणार असून, तुम्ही हे हॅशटॅग्स व्हिडिओच्या खाली आणि वर दोन्हीकडे वापरु शकता.

नियम पाळणं आवश्यक

मात्र, युट्यूबवर हॅशटगचं खास फिचर वापरण्यापूर्वी काही नियमांचं पालन करणं तितकच बंधनकारक असणार आहे. गुगलच्या सपोर्ट पेजवर ही नियमावली देण्यात आली आहे. युजर्सकडून वापरण्यात आलेले आक्षेपार्ह्य किंवा चुकीचे हॅशटॅग्सही युट्यूबकडून लगेच काढून टाकले जातील. एखाद्या व्यक्तीचा किंवा समुदायाचा अपमान करणारे, एखाद्या जाती- धर्माविरुद्ध चुकीचं भाष्य करणारे तसंच हिंसा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणारे हॅशटॅग्स असल्यास ते त्वरित काढून टाकले जातील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -