घरटेक-वेकXiaomi च्या सब-ब्रँडने लाँच केला पोर्टेबल फॅन; एकदा चार्ज केल्यास १३ तास...

Xiaomi च्या सब-ब्रँडने लाँच केला पोर्टेबल फॅन; एकदा चार्ज केल्यास १३ तास चालणार

Subscribe

Xiaomi द्वारा ZMI ब्रँडने पोर्टेबल फॅन नुकताच लाँच केला आहे. हा फॅन युजर्सना आपल्या गळ्यात लटकवून वापरता येणार आहे. या फॅनची रचना अनोखी असून हा फॅन आकर्षक रंगात ग्राहकांना खरेदी करण्यास उपलब्ध आहे. हा पोर्टेबल फॅन 0 ° ते 120 ° कोनात फोल्ड करता येतो. या फॅनच्या फोल्डेबल डिझाइनमुळे तो गळ्यात लटकवून ठेवण्यासह कोणत्याही सपाट पृष्ठभागावर ठेवता येतो. त्यामुळे तुम्ही हा फॅन ऑफिस टेबल किंवा स्वयंपाकघरात देखील वापरू शकतात. ZMI पोर्टेबल फॅन पांढर्‍या, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून त्यात आरजीबी लाइटिंग देखील मिळणार आहे. ज्यामुळे हा फॅन अंधारात बर्‍यापैकी आकर्षक दिसतो. ही लाइटिंग पंख्याच्या बाजूला असलेल्या बटणाद्वारे देखील बदलणं शक्य होते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या पोर्टेबल फॅनमध्ये ब्रशलेस मोटर आहे, जी या फॅनमध्ये असणाऱ्या सात ब्लेड समाविष्ट असलेल्या फॅनला ऊर्जा देण्याचे काम करते. ब्रशलेस मोटार या फॅनमध्ये असल्याने पंख्याचे पाते फिरताना आवाज कमी येतो. या फॅनला तीन स्पीड सेटिंग्ज देण्यात आली आहे. यासह या फॅनला साफ करणे देखील खूप सोपे असून फॅन स्वच्छ करताना याचे भाग वेगळे करता येतात.

- Advertisement -

या फॅनचा बॅटरी बॅकअपही चांगला आहे. ZMI चा असा दावा आहे की, या फॅनला एकदा चार्ज केल्यास तो १३ तास न बंद होता चालतो. फॅनच्या स्पीड सेटिंग्जनुसार यामध्ये बदल होऊ शकतो. कंपनीने म्हटले की, हा फॅन कमी वेगाने चालवला तर १३ तास, मध्यम वेगाने ८ तास आणि वेगाने चालवला तर ४ तास सुरू राहू शकतो. हा फॅन USB Type-C पोर्टसह येतो आणि विशेष म्हणजे या फॅनची चार्जिंग केबल बाहेर न दिसता त्याच्या बॉक्समध्ये असते.  चीनमध्ये ZMI Hanging Neck Folding Fan ची किंमत CNY 99 (साधारण 1,130 रुपये) आहे. 15 मे रोजी होणाऱ्या पहिल्या विक्रीत हा फॅन CNY 89 (साधारण1000 रुपये) मध्ये विकला जाणार आहे. या फॅनचे वजन 130 ग्रॅम आहे, म्हणजे आजच्या स्मार्टफोनपेक्षा त्याचे वजन हलके असल्याचे सांगितले जात आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -