Eco friendly bappa Competition
घर thane झाडे कोसळून ९० दिवसात ६१७ घटनांमध्ये ९२ वाहनांचे नुकसान

झाडे कोसळून ९० दिवसात ६१७ घटनांमध्ये ९२ वाहनांचे नुकसान

Subscribe

ठाणे हे असे शहर आहे. की, येथे उन्हाळा असो पावसाळा असो या हिवाळा असो कधी कुठे झाड किंवा झाडाची फांदी पडले हे सांगता येत नाही. अशाप्रकारे ठाणे महापालिका हद्दीत गेल्या ९० दिवसात ३०१ झाडे पडले असून ३१६ झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. यामध्ये तब्बल ९२ गाड्यांचे नुकसान झाले असून सर्वाधिक ५८ चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. त्या घटनांमुळे वाहनचालकांना त्याचा नाहक फटका बसला आहे. तसेच ठाण्यात गाडी पार्क करता तर जरा जपून पार्क असेच म्हणण्याची वेळ आल्याचे या घटनांवरून दिसत आहे.
यंदा सर्वत्र पाऊस उशीरच झाला. पण याच पावसाळ्यात ठाणे शहरात झाडे आणि त्याच्या फांद्या तुटून पडण्याचा जणून अक्षरशः पाऊस पडल्याचे पाहण्यास मिळाला आहे. गेल्या ९० दिवसात तब्बल ६१७ घटना या झाड आणि त्याची फांद्या तुटून पडल्याचा आहेत. जुलै महिन्यात १४५ झाड आणि १४० फांद्या तुटून पडल्याने त्या घटनांमध्ये तब्बल ५० गाड्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये ३० चारचाकी तर १३ दुचाकी ०७ तीन चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त वारंवार झाडांच्या फांद्या तोडण्याचा सूचना करत आहेत. पण, या घटनांकडे पाहून आयुक्त करत असलेल्या सूचना संबंधित विभाग आत्मसात करतो का? हाच संशोधनाचा विषय आहे. असो ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारली असताना सुद्धा या महिन्यात २७ झाडे, ३८ झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. या घटनांमुळे वाहन चालकांना पार्क करावे तर कुठे असा प्रश्न सतावत आहे.

झाडे आणि फांद्या पडल्याचा तक्ता
महिना  झाड/ फांदी   दुचाकी  तीनचाकी चारचाकी
जून      १२९ / १३८    ०७         ०५         १९
जुलै     १४५ / १४०   १३           ०७         ३०
ऑगस्ट ०२७ / ३८      ००           ०२        १०
एकूण  ३०१/ ३१६    २०          १४         ५८

- Advertisement -

सरासरी एका गाडीचे होतेय नुकसान
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात झाड असो या फांद्या तुटून पडल्याचा घटनांमध्ये ९२ गाड्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटना ९० दिवसात घडल्याने सरासरी दिवसाला एका गाडीचे नुकसान झाल्याने वाहन चालकांनो गाडी पार्क करताना जरा जपूनच पार्क करा असे म्हटले जाऊ लागले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -