घर thane मनसे लढणार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागा

मनसे लढणार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागा

Subscribe
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपडले असून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील चार जागा निवडणार लढणार आहे. तसेच ठाण्यातील तीन आणि पालघर येथील एका जागेसाठी उमेदवार ही निश्चित असल्याचे मनसेचे ठाणे -पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बोलताना दिली. यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच पुढील सहा महिन्यात महाराष्ट्र सैनिक घराघरात पोहचणार असल्याचेही सांगण्यात आले. याचदरम्यान या बैठकीत कळवा रुग्णालया संदर्भात राज ठाकरे यांनी माहिती घेतली असून बळी कशामुळे गेले आहेत, त्याची माहिती घेतली पाहिजे अशी सुचना त्यांनी केली.  तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण सारख्या अनेक शहरात खड्डे पडले असून प्रशासनाला जागे करण्यासाठी लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याच्या सुचनाही राज यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरासह जिल्ह्यात आधीच भाजपने डोके दुखी वाढविली आहे. त्यात काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात हजेरी लावून शिंदे गटाला आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर आता मनसे थेट लोकसभा निवडणुक लढण्याचे जाहीर करुन शिंदे गटाला मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत त्या दृष्टीने मोर्चे बांधणी कशी करायची याची चर्चा झाली असून  पुढे जाऊन कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काय करावे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती जाधव यांनी दिली.आमचा एक आमदार आहे तो देखील आमचा हक्काचा आहे. येणाऱ्या चार दिवसात मनसेत मोठा प्रवेश होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
कळवा रुग्णालयात मृत्युचे तांडव झाल्यानंतर गुरुवारी राज ठाकरे देखील त्याठिकाणी जातील अशी शक्यता होती. किंबहुना ते त्याच मार्गे पुढे दौºयासाठी गेले. मात्र त्यांनी कळवा रुग्णालयात जाणे टाळले. केवळ तेथील रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून त्याठिकाणी जाणे टाळल्याचा दावा जाधव यांनी केला. तर आयुक्तांशी चर्चा करुन जे जे रुग्णालयमध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत, त्या धर्तीवर कळवा रुग्णालयात काय करता येईल का? याची चर्चा करावी अशा सुचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मनसे नेते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी त्यांच्या वर्ग मैत्रीण असलेल्या अशिलता राजे यांची त्यांची घरी जाऊन भेट घेतली. ते दादर येथील बालमोहन शाळेत ते एकत्र होते.  पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी ठाणे विश्रांती गृहातच मिसळवर ताव मारला. ठाकरे यांची ठाण्यातील मामलेदार ची ही आवडीचे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अमित ठाकरे आणि मनसेचे इतर पदाधिकारी ही उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -