घरठाणेनिवडणूक आयोगाचा आदेश डावलून गैरहजर, ९१ शिक्षकांवर होणार कायदेशीर कारवाई  ...

निवडणूक आयोगाचा आदेश डावलून गैरहजर, ९१ शिक्षकांवर होणार कायदेशीर कारवाई                        

Subscribe

मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या ९१ शिक्षकांनी आदेशाला केराची टोपली दाखवून गैरहजर राहिल्याप्रकरणी या शिक्षकांवर फौजदारी कारवाईसाठी मुरबाड पोलीस आणि गटशिक्षणाधिकार्‍यांना लेखी पत्र दिले आहे.

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित करण्यात आल्यानंतर निवडणूक केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी इत्यादी कामांसाठी कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यासाठी लेखी आदेश पारित केले जातात. त्या अनुषंगाने मुरबाड तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षिका यांना निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून प्रशिक्षणासाठी जानेवारीला एक, चार आणि आठ तारखेला नमस्कार हॉल मुरबाड येथे मतदान केंद्राध्यक्ष आणि  मतदान अधिकारी म्हणून आदेशित करण्यात आले होते.

- Advertisement -

तसेच १५ जानेवारी २०२१ रोजी घोषित ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार असल्याने १४ जानेवारी २०२१ रोजी आदेश पारीत केलेल्या कर्मचार्‍यांनी तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहून मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी म्हणून निवडणूक केंद्रांवर जाण्यासाठी टाळाटाळ न करता हजर राहून निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कायद्याने  बंधनकारक आहे. असे असताना मुरबाड तालुक्यातील एकूण ९१ शिक्षकांनी शासकीय आदेश धुडकावून निवडणुकीत मतदान केंद्रावर गैरहजर राहिल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम २३ अन्वये मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी म्हणून नेमणुका केलेल्या शिक्षक आणि शिक्षिका यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी काढले आहेत.

शाळेतही हजेरी नाही

 

- Advertisement -

गैरहजर शिक्षकांनी शाळेच्या फळ्यावर मात्र तीन दिवस निवडणूक कार्यक्रमात व्यग्र आहोत असे लिहिले असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच हे शिक्षक निवडणूक केंद्रांवर नाहीत आणि शाळेतही नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -