घरठाणेस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित; 14 ऑगस्टला ठाणे महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित; 14 ऑगस्टला ठाणे महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा

Subscribe

ठाणे – महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 14 ऑगस्ट रोजी 10 कि.मीच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आज महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहत येथे अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली (उपायुक्त) क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, वाहतूक पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे सचिव अशोक आहेर, प्रमोद कुलकणी व पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत स्पर्धेचे नियोजन करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेच्यावेळी ठाणे पोलीसांची मॅरेथॉन सुद्धा ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून याच ठिकाणी समाप्त होणार आहे.

- Advertisement -

 मॅरेथॉन स्पर्धा जिल्हास्तरीय –

जिल्हास्तरावर होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरूष (वयोगट 18 वरील खुला गट), महिला (16 वर्षावरील खुटा गट) असे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून होणार असून नितिन कंपनी, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, वर्तकनगर, शिवाईनगर, उपवान तलाव, बिरसा मुंडा चौक, उन्नती गार्डन, शिवाईनगर येथून पुन्हा त्याच मार्गावरुन महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे.

- Advertisement -

 स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 15 हजार –

या स्पर्धेतील पुरूष व महिला या दोन्ही गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास रुपये 15 हजार , द्वितीय रुपये 12 हजार, तृतीय रुपये 10 हजार, चतुर्थ रुपये 7 हजार, पाचवे रुपये 5 हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -