घर ठाणे १३० उद्यानांचा होणार लवकरच कायापालट

१३० उद्यानांचा होणार लवकरच कायापालट

Subscribe

ठाणे शहरातील बहुतांश उद्याने हे निधी अभावी दुरावस्थाच्या खाईत अडकून पडलेली आहेत. त्यातच या उद्यानाला नवीन झळाली मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने शासनाकडे ७५ कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्या निधीला आता राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील १३० उद्यानांचा लवकरच कायापालट होणार आहे. यामध्ये उद्यानात चालण्यासाठी फुटपाथ, संरक्षक भिंत, विद्युत रोषणाई, फाऊंटन, नव्याने वृक्ष लागवड, रंगरंगोटी, टॉयलेट, पाण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियाणांतर्गत एकीकडे शहर सौंदर्यीकरणाबरोबर खड्डेमुक्त ठाणे हे कामे हाती घेण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सक्षमीकरण असो किंवा महापालिका मुख्यालय इमारत उभारणीसाठी राज्य शासनाने निधी मंजूर करून दिला आहे. याचदरम्यान ठाणेकर नागरिकांनाचा जिव्हाळ्याचा विषय असलेला आणि शहराच्या सौंदर्याला डाग लावणारे उद्याने विकसित करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी राज्य शासनाकडे ७५ कोटींची मागणी केली होती. केलेल्या मागणीनुसार निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उद्यानांचा कायापालट होणार आहे. मात्र हा कायापालट करताना तेथील कामाच्या दर्जदारावर विशेष लक्षकेंद्रित केले जाणार आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांना सुसज्ज आणि मन प्रसन्न होईल अशा सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -