Eco friendly bappa Competition
घर ठाणे गोविंदा रे गोपाळा! ठाण्यात १५०० दहीहंडीचे आयोजक सज्ज, १५ ठिकाणी मानाच्या हंड्या

गोविंदा रे गोपाळा! ठाण्यात १५०० दहीहंडीचे आयोजक सज्ज, १५ ठिकाणी मानाच्या हंड्या

Subscribe

ल्हासनगर सोडले तर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळात मानवी मनोऱ्यांचा (थर) थरार पाहण्यास मिळणार आहे.

ठाणे – दहीहंडीची पंढरी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात यंदा सुमारे पंधराशे ठिकाणी मोठ्या जल्लोषात दहीकाला उत्सव साजरा होणार आहे. यामध्ये सार्वजनिकपेक्षा खासगी दहीहंडीची संख्या बाराशेच्या घरात आहे. तर १५ ठिकाणी मानाच्या हंड्या उभारण्यात येणार आहेत. उल्हासनगर सोडले तर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळात मानवी मनोऱ्यांचा (थर) थरार पाहण्यास मिळणार आहे. (1500 Dahi Handi organizers ready in Thane)

हेही वाचा – ढाकू माकूम…! मनसेकडून दहीहंडीसाठी लाखोंची बक्षिसे, ‘स्पेन’वारीही घडवणार

- Advertisement -

दरम्यान १२४ ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला असून दहीकाला उत्सवासाठी ८८ गोविंदा पथक मिरवणूक काढून दहीकाला उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल एक हजार ४५६ हंड्या उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये एक हजार १९५ हंड्या खासगी असून उर्वरित २६१ हंड्या सार्वजनिक असणार आहेत. त्यामध्ये १५ ठिकाणीच मानाच्या हंड्या उभारल्या जाणार आहेत. ठाणे शहर आणि कल्याण या परिमंडळात प्रत्येकी तीन तर वागळे इस्टेट येथे ४ आणि भिवंडीत ५ ठिकाणी मानाच्या हंड्यांचा समावेश आहे.

१२४ ठिकाणी जन्माष्टमी सोहळा 

श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १२४ ठिकाणी पार पडला. यामध्ये ठाणे शहर १८,भिवंडी २८, कल्याण ४२,उल्हासनगर १६ आणि वागळे इस्टेट २० ठिकाणाचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गो…गो…गोविंदा! डोंबिवलीत दहीहंडीची जय्यत तयारी, कलाकारही राहणार उपस्थित

८८ गोविंदा पथक सज्ज

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ८८ गोविंदा पथक सज्ज झाले आहे. मानवी मनोरे उभे करून ते दहीकाला उत्सव साजरा करणार आहेत. यामध्ये ठाणे शहर १३,भिवंडी २१, कल्याण १२,उल्हासनगर १६ आणि वागळे इस्टेट २६ पथकांचा समावेश आहे.

सार्वजनीक दहिहंडी व खाजगी दहिहंडीचा तक्ता

परिमंडळ      सार्वजनिक       खासगी
ठाणे शहर        ०५२                २७३
भिवंडी             ०४९               २३०
कल्याण           ०५०               २९३
उल्हासनगर      ०५१               १९२
वागळे इस्टेट    ०५९               २०८
एकूण            २६१                 ११९५

- Advertisment -