Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाण्यात 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर हा पंधरवडा 'स्वच्छता लीग' म्हणून साजरा...

ठाण्यात 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर हा पंधरवडा ‘स्वच्छता लीग’ म्हणून साजरा होणार

Subscribe

स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या अभियानात देशातील 3 हजार 85 शहरांचा सहभाग असून महाराष्ट्रातील एकूण 411 शहरांचा यात समावेश आहे. 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जाणार आहे.

ठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या अभियानात देशातील 3 हजार 85 शहरांचा सहभाग असून महाराष्ट्रातील एकूण 411 शहरांचा यात समावेश आहे. 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जाणार असून इंडियन स्वच्छता लीग 2.0 या उपक्रमातंर्गत ठाणे शहराच्या ‘ठाणे टायटन्स’या बोधचिन्हाचे अनावरण संघाचे कर्णधार व प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मंगळवारी करण्यात आले. (15th September to 02nd October will be celebrated as ‘Swachhata League’ in Thane)

हेही वाचा – Rain Update : ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली शक्यता

- Advertisement -

आपल्या ठाणे शहराची स्वच्छता ही उत्तम असली पाहिजे आणि आपल्या शहराने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली पाहिजे. त्यासाठी इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मी स्वत: सहभागी होणार आहे. ठाणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अभिनेता भाऊ कदम याच्याकडून करण्यात आले आहे. तर 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जाणार असून ठाणे शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशी ओळख आहे. या शहराला स्वच्छ शहराची ओळख मिळवून देण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, असे आवाहनही आयुक्तांकडून करण्यात आले.

इंडियन स्वच्छता लीगची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे ज्या ठिकाणी कचरा होतो त्या जागा हेरुन तिथून कचऱ्याचे समूळ उच्चाटन करणे, समुद्र किनारे, टेकड्या, पर्यटन स्थळे, शहरातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी तरुणांच्या पुढाकाराने विविध संघाद्वारे मोठ्या प्रमाणात स्वच्छता करणे, कचरामुक्त शहरांसाठी तरुणाच्या स्वच्छतेबाबतच्या सहभागाला चालना देणे हे असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक असून यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

याच उपक्रमात रविवारी 17 सप्टेंबर रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे इंडियन स्वच्छता लीगच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ठाणेकर नागरिकांनी सहभाग घ्यावा, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. स्पर्धेची लिंक सर्व शाळांना देण्यात येणार असून शाळांनी विद्यार्थी व पालक यांच्यामार्फत रजिस्ट्रेशन करून हा सर्व डेटा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे सादर करावा. तसेच, 17 सप्टेंबर रोजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या अनुषंगाने वेशभूषा करणे, वेगवेगळ्या कल्पनांचे फलक करणे, स्वच्छता व इतर काही अनुषंगिक नाविन्यपूर्ण सादरीकरण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहभागी करावे. या स्पर्धेत ज्या शाळा प्रथम क्रमांक प्राप्त करतील, त्या शाळेत ठाणे टायटन्स संघाचे कर्णधार अभिनेते भाऊ कदम हे स्वत: भेट देतील असेही आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -