बनावट विवाह प्रमाणपत्राद्वारे कोट्यवधींची मालमत्ता हडप; खंडणीविरोधी पथकाकडून महिलेसह तिघांना अटक

19 crores Property worth stolen fake marriage certificate Anti-extortion squad arrests three including a woman thane

ठाणे: बनावट विवाह प्रमाणपत्र तयार करून त्याव्दारे १९.७० कोटी मालमत्ता हडपणाऱ्या महिलेचा डाव ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने उधळून लावला आहे. याप्रकरणी नौपाड्यातील अंजली घनश्याम अग्रवाल (३०) हिच्यासह माजीवडा येथील थॉमसर रामुल गोडपवार (५०) आणि बाळकुम येथील महेश गणेश काटकर (३७) या त्रिकुटाच्या हातात बेड्या घालण्यात यश आले असून त्यांना न्यायालयाने येत्या ७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.

अटक केलेल्या अंजली हिचे मयत अनिल पापडे यांच्या प्रेमसंबंध होते. अनिल याचे २३ नोव्हेंबर २०२१ निधन झाले. त्यानंतर अंजली हिने अटकेतील दोन साथीदारांच्या मदतीने बनविलेले बनावट विवाह प्रमाणपत्राचा आधाराद्वारे वारस हक्क सांगून ठाणे येथील तीन फ्लॅट, मयताचे नावे असलेली कावेसर येथील मोकळी जागा, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण १९.७० कोटीची स्थावर व जंगम मालमत्ता अपहार केला. याप्रकरणी मयत अनिल यांची आई सुरेखा सुरेश पापडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत, नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार १६ मे २०२२ गुन्हा दाखल झाला.

त्या तक्रारीची चौकशीमध्ये त्यांचा मयत मुलगा अनिल पापडे याच्याशी लग्न झाल्याचे बनावट प्रमाणपत्र अंजली अग्रवाल हिने कविता पटेल, साहील जी व लक्ष्मी एम, यांचे मदतीने तयार करून मयताची १९.७० कोटीची स्थावर व जंगम मालमत्ता हडप केल्याचे निष्पन्न झाले. ३ ऑक्टोबर रोजी तिला अटक करण्यात आली. अटके दरम्यान तीने सदरचे प्रमाणपत्र हे थॉमसर गोडपवार, महेश काटकर यांचे मदतीने तयार केल्याचे सांगितले. त्या आधारे त्यांनाही या गुन्हयात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या तिघांना न्यायालयाने येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त,लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२, अशोक राजपुत, तसेच खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे, सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, पोलीस उपनिरीक्षक विजय राठोड, महेश कवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, सत्यवान सोनवणे, पोलीस हवालदार संजय बाबर, जगन्नाथ सोनवणे, राठोड, योगीराज कानडे, कल्याण ढोकणे, संदिप भोसले, सुहास म्हात्रे, पोलीस नाईक भगवान हिवरे, शितल पावसकर, पोलीस शिपाई शेजवळ, देवेंद्र देवरे, तानाजी पाटील, मयुरी भोसले यांनी केली आहे.


शिवसेना – शिंदे गटातील टीझर वॉरनंतर आता शिंदे गटाकडून नवं गाणं रिलीज