घरठाणेडेबिटकार्डद्वारे पोलिसांची २ लाख ३३ हजारांची फसवणूक

डेबिटकार्डद्वारे पोलिसांची २ लाख ३३ हजारांची फसवणूक

Subscribe

ठाणे रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास त्यांच्या मोबाईलवरील ई-मेल द्वारे मिळालेल्या माहितीने क्रेडिट कार्डवरून २,३३,२१२ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली असल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले आणि लाखो रुपयांची फसवणूक झालेले विजय शेंडगे पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून कल्याण येथे ते राहत आहेत. १७ ते १८ जानेवारी दरम्यानच्या काळात त्याच्या मोबाईलवर ई-मेलद्वारे मिळालेल्या माहितीनुसार २ लाख ३३ हजार २१२ रुपये परस्पर काढण्यात आल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. याबाबत त्यांनी ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता ती  बाजार पेठ पोलीस स्टेशन मध्ये वर्ग केली आहे.

- Advertisement -

बाजारपेठ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचे त्यांचेकडे क्रेडिट कार्ड असून त्यांच्या कार्डचा अज्ञात भामट्याने दुरुपयोग करून त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेचा परस्पर अपहार केला. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे  इन्स्पेक्टर एस बी खोत याप्रकरणी अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -