ज्येष्ठ नागरिकांचा एसटीतून मोफत प्रवास सुरु; २० दिवसात २० हजार वयोवृद्धाची लालपरीला पसंती

150 CNG buses in ST fleet soon msrtc Contribute to prevent pollution

ठाणे: देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लालपरीतून मोफत प्रवासाची सवलत राज्य सरकारने बहाल केली आहे. त्याला ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मागील २० दिवसात अंदाजे २० हजार ज्येष्ठ नागरिकांनी लालपरीला पहिली पसंती दिल्याचे दिसत आहे. यावरून सरासरी दिवसाला जिल्ह्यात एक हजार ज्येष्ठ नागरिक एसटीतून सुखकर आणि आरामदायी प्रवास करत आहेत. हा प्रवासाला फक्त जन्म दाखलाची माहिती असणारे एखादे कागदपत्रे दाखवल्यावर करता येत असल्याची माहिती एसटीच्या ठाणे विभागाने दिली.

एसटीच्या ठाणे विभागात एकूण आठ आगार येतात, त्या आगारातून सुटणारी एसटीची साधी बस असो या निमसाधी, किंवा मग शिवशाही असो या वोल्वो या प्रकारच्या बसेस जिल्ह्यात नाहीतर राज्यभर दररोज धावत आहेत. यापूर्वी एसटीतून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांकडून तिकिटीचे ५० टक्के प्रवास शुल्क आकारण्यात येत होते. त्यातच, हे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असल्याने त्याचे औचित्य साधून राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवेची सुविधा उपलब्ध करून देणारा धाडसी निर्णय घेतला. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात एसटीतून ज्येष्ठ नागरिकांना २६ ऑगस्टपासून मोफत प्रवास सेवा देण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जिल्ह्यात १८० ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. त्यानंतर ती संख्या वाढत गेली. तर दहाव्या दिवशी तब्बल ८१० जणांनी या सुविधेचा लाभ घेतला. तसेच बाराव्या दिवसापासून रोज बाराशे ते अठराशे हुन अधिक ज्येष्ठ एसटीतून प्रवास करत आहेत. अशाप्रकारे मागील २० दिवसात ठाणे जिल्ह्यातून तब्बल १९ हजार ४४५ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत एसटी प्रवासाचा लाभ घेतला आहे.

 वोल्वो बसमधून ज्येष्ठांना मोफत प्रवास

महामंडळाच्या इतर बसप्रमाणे आता ज्येष्ठांना वोल्वो बसमधून मोफत प्रवास करता येत आहे. यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक, आमदार खासदारांनाच या बस सेवेतून प्रवास करता येत होता. त्यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ नागरिकांचा या सेवेतून प्रवास करण्यासाठी समाविष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आगारानुसार प्रवासी तक्ता

आगार       प्रवासी संख्या

ठाणे –       १ २,२४२
ठाणे –       २ २,५८३
भिवंडी       १,५८३
शहापूर      ३,७२४
कल्याण     ३,०५४
मुरबाड     ३,२२०
विठ्ठलवाडी १,९२८
वाडा       १,१०८
एकूण    १९,४४५


दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीचा मोठी कारवाई; देशभरात 40 ठिकाणी छापेमारी