घरठाणेमुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या तबलिगी जमातीच्या २१ जणांची सुटका

मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या तबलिगी जमातीच्या २१ जणांची सुटका

Subscribe

मुंब्र्यातून अटक केलेल्या तबलिगी जमातीच्या २१ जणांची मंगळवारी ठाणे न्यायालयाने सुटका केली आहे. यामध्ये १३ बांगलादेशी आणि ८ मलेशियन नागरिकाचा समावेश आहे. या २१ जणांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे न्यायालयाने रद्द केल्यामुळे त्याची मंगळवारी सुटका करण्यात आली. दिल्लीतील मरकज येथील तबलिगी जमातीच्या मेळाव्यात सहभाग घेतल्याचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या दरम्यान दिल्ली येथील मरकज येथे तबलिगी जमातीच्या मेळाव्यात हजारो जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकाचा देखील समावेश होता. या मेळाव्यानंतर तबलिगी जमातीच्या लोकांनी परतीचा प्रवास केला होता. त्यापैकी २१ जणांनी मुंब्रा येथील दोन धार्मिक स्थळी आश्रय घेतला होता. मुंब्रा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये १३ बांगलादेशी नागरिक आणि ८ मलेशियन नागरिकांचा समावेश होता. या २१ जणांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती.

- Advertisement -

“आम्ही मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या तबलीगी जमात सदस्यांविरोधात एफआयआर रद्द करण्याच्या आदेशाचा आधार घेऊन डिस्चार्जसाठी कलम २३९ च्या फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ अन्वये अर्ज दाखल केला. आम्ही असा दावा केला की त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे खोटे असून त्यांनी वैध व्हिसावर धार्मिक स्थळी भेट दिली. त्यांच्याकडून कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याचा थेट पुरावा मिळालेला नाही”, असे ठाणे न्यायालयात तबलिगी जमातीची बाजू मांडणारे वकील इस्माईल शेख यांनी सांगितले.

ठाणे न्यायालयाचे न्याय दंडाधिकारी आर. एच. झा यांनी असे नमूद केले की परदेशी नागरिकांवर कोणताही गुन्हा केला जात नाही. म्हणून तेथे न्यायाच्या हितासाठी डिस्चार्जसाठी अर्ज करण्याची परवानगी आहे आणि या प्रकरणातील कार्यवाही बंद करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तबलिगी जमातीच्या २१ जणांची मंगळवारी ठाणे न्यायालयाने सुटका केली आहे. यामध्ये १३ बांगलादेशी आणि ८ मलेशियन नागरिकाचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -