घरठाणेएनडीआरएफच्या 22 जवानांची तुकडी महापालिका क्षेत्रात दाखल !

एनडीआरएफच्या 22 जवानांची तुकडी महापालिका क्षेत्रात दाखल !

Subscribe

मागील तीन दिवसापासून ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी

दरवर्षी ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे जीवित, वित्तहानीस सामोरे जावे लागते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीच्या पावसाळ्याची सुरुवात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून झाल्यानंतर जोरदार पावसाची शक्यता असल्याने एनडीआरएफची तुकडी ठाणे जिल्ह्यात दाखल झाली आहे.

मागील तीन दिवसापासून ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पूर प्रवणतेचा विचार करता पूरपरिस्थिती, इमारत, दरड कोसळणे , वाहतूक कोंडी तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीतीत आपत्तींना सामोरे जाण्यासाठी मान्सून कालावधी करीता, बचावकार्यासाठी संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत ठाणे जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांची नेमणूक करण्यात आली.

- Advertisement -

त्यापैकी 22 जवानांची एक टीम कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर, भिवंडीसाठी देण्यात आली आहे.या टिमने बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करुन कल्याण डोंबिवलीतील भौगोलिक परिस्थितीचा आढावा जाणून घेतला.

अतिवृष्टीच्या काळात दुर्गाडी परिसरात तसेच अंबिका नगर, शहाड या सखल परिसरात पाणी साचून लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, यासाठी एनडीआरएफच्या पथकाने महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक निकम यांच्या समवेत दुर्गाडी गणेश घाट परिसर, अंबिका नगर, शहाड या परिसराची पाहणी केली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी निर्देशानुसार एनडीआरएफच्या या पथकाच्या निवासाची तसेच इतर व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -