घरठाणेठाण्यात 22022022 अनोख्या तारखेची क्रेझ

ठाण्यात 22022022 अनोख्या तारखेची क्रेझ

Subscribe

६५ जणांनी आयुष्यभर साथ देण्याच्या घेतल्या शपथा

तरुणाईचा कळ आता मुहूर्तापेक्षा जरा हटके अशाच येणाऱ्या तारखांकडेच वळत असल्याचे दिसत आहे. मग, व्हॅलेन्टाईन असो किंवा मंगळवारी आलेली 22022022 ही जरा हटके आणि लक्षात राहणारी तारीख असो,या दिवशी तरुणाई आयुष्यभर साथ देण्यासाठी शपथ घेताना ठाण्यात दिसून आले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर ठाणे दुय्यम विवाह नोंदणी कार्यालय नववधू-वरांसह वऱ्हाडी मंडळींनी गजबजून गेले होते. तर दिवसभरात तब्बल ६५ नवदाम्पत्यांनी आपला लग्नाचा बार उडवत लग्नाच्या गोष्टीचा शुभमंगल केला. लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या जोडप्यांचा हा आकडा या वर्षात नाहीतर आतापर्यंतचा सर्वाधिक असल्याचे माहिती संबंधित विभागाने बोलताना सांगितले आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात सावट सर्वत्र पसरले होतेच. त्यामुळे निर्बंध ही तितके होते. ते आता कुठे कमी होत असताना, लग्न हे आयुष्यात एकदाच होत असल्याने तो सोहळा नेहमीच लक्षात राहावे, याकडे तरुणाई जात असल्याचे दिसत आहे. मग यामध्ये नेहमीच व्हॅलेन्टाईनच्या सप्ताहात किंवा व्हॅलेन्टाईन डेला तरुणाई लग्नाच्या अनोख्या बंधनात अडकताना दिसतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तरुणाई मुहूर्त आणि व्हॅलेन्टाईन डेला विशेष महत्त्व न देता जरा हटके किंवा अनेक वर्षांनी येणाऱ्या तारखेला लग्नाचा घाट घालताना दिसत आहेत.

- Advertisement -

एकीकडे थाटामाटा लाखो रुपये खर्चून लग्न न करता कोर्ट मॅरेज करताना दिसत आहेत. अशाच ११ ,११,२०११ आणि १२, १२, २०१२ या तारखांना अनुक्रमे २७ आणि अंदाजे ३० ते ३५ जणांनी लग्नाच्या सप्तपदी नाहीतर, आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली होती. त्याचप्रमाणे 22022022 या तारखेला ४० -४५ जोडप्यांनी लग्नाचे नियोजन केले होते. मात्र सकाळपासून कार्यालयात नववधू-वरांसह वऱ्हाडी मंडळींनी हजेरी लावल्याने आज नेहमीपेक्षा कित्येक पटीने हे कार्यलय गजबजून गेले होते. एका पाठोपाठ एक अशी तब्बल ६५ जणांनी लग्नाचा बार उडवून दिला आहे.

अधिकारी-कर्मचारी झाले थक्क
४० ते ४५ जणांच्या नोंदणी असल्याने हा आकडा ५० वर जाईल अशी शक्यता संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वर्तवला जात होती. मात्र सकाळी सुरुवात झाल्यापासून कार्यलयीन वेळ संपेपर्यंत तब्बल ६५ जोडप्यांनी हजेरी लावल्याचे पाहून अधिकारी- कर्मचारी थक्कच झाले.

- Advertisement -

या वर्षात ७६५ जोडपी विवाहबद्ध
२०२२ हे वर्ष सुरू होत असताना कोरोना आणि घातलेले निर्बंध कमी झाले. त्यामुळे जणू एकप्रकारे लग्नाचा धडाका लागला आहे. ५३ दिवसात विक्रमी ७६५ जोडप्यांनी नव्या इंनिंगची सुरू केली. यामध्ये जानेवारी महिन्यात ४०० ते ४५० तसेच उर्वरित फेब्रुवारीमधील असून त्यामध्ये मंगळवारचे ६५ जोडप्यांचे शुभमंगल असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -