ठाण्यात एसटीपीच्या टाकी पडून तरुणाचा मृत्यू

32 year old man dies after falling Sewage treatment plant tank in thane
ठाण्यात एसटीपीच्या टाकी पडून तरुणाचा मृत्यू

ठामपाच्या एस.टी.पी. (मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प) च्या टाकीमध्ये पडल्याने वागळे इस्टेट,साठेवाडी येथील रहिवासी असलेले मनोज शिवराम मोरे (३२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची बाब शनिवारी पहाटे ०१:०९ वाजताच्या सुमारास समोर आली. ही घटना ज्ञानसाधना कॉलेज जवळ, साठेवाडी परिसरात घडली.

ठामपाच्या एस.टी.पी. (मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प) च्या टाकीमध्ये मध्ये एक जण पडले आहेत अशी माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि वागळे अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढून वागळे इस्टेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णवाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय, येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.