घरठाणेस्वतःच्या घरात लावली तब्बल साडेतीन हजार झाडे

स्वतःच्या घरात लावली तब्बल साडेतीन हजार झाडे

Subscribe

ठाण्यातल्या ६२ वर्षीय ट्री मॅन विजयकुमार कट्टी यांनी चक्क घरभर विविध प्रकारची दुर्मिळ  रोपं आणि झाडं लावली आहेत.  सध्या कोरोनाचे वातावरण आहे त्यामुळे त्यामधून घरातच ऑक्सीजन मिळणार आहे.

कोरोना काळात शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होऊ नये म्हणून प्रत्येकजण कोणते ना कोणते उपाय करत असतात. यासाठी तुम्ही घरातच झाडे लावा त्यामुळे तुम्हला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकेल असा मोलाचा सल्ला देण्यासाठी, ठाण्यातील ‘ट्री मॅन’ म्हणून संबोधल्या जाणार्‍या विजय कुमार कट्टी यांनी आपल्या घरातच जवळपास साडेतीन हजार झाडे लावली आहेत. त्यांनी अशी जवळपास बावीस हजार झाडे अनेकांच्या घरी लावलेली आहेत. आणि भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अशी ७५ हजार झाडे लावण्याचा त्यांनी निश्चय केला आहे.

आपल्याला लहानपणापासूनच झाडांचे महत्त्व सांगितले जाते. झाडे लावा झाडे जगवा असे फलक देखील आपण जागोजागी बघतो. झाडापासून अनेक फायदे असल्याची माहिती अनेक माध्यमांतून  मिळत असते. परंतु शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. ‘आम्ही शहरांमध्ये राहतो, जागा खूप कमी आहे, झाडे कशी लावणार घरात झाडांना सूर्यप्रकाश मिळत नाही’ यासारख्या अनेक प्रश्नांना उत्तर देत कट्टी यांनी हा उपक्रम राबवला आहे. झाडांचे महत्त्व सांगत त्यांनी झाडेही घरातही जगू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे.

- Advertisement -

 

ठाणे शहरात जागोजागी काँक्रिटीकन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि त्यामुळे हळू हळू हिरवळ व झाडे गायब होत चालली  आहेत.  माणूस जसा जसा वेगात प्रगती करू लागला, मोठमोठ्या इमारती उभारू लागला, तसतसा झाडांच्या नशिबात ऱ्हासच येत राहिला. पण सगळी माणसं सारखी नसतात . ठाण्यातल्या ६२ वर्षीय ट्री मॅन विजयकुमार कट्टी यांनी चक्क घरभर विविध प्रकारची दुर्मिळ  रोपं आणि झाडं लावली आहेत.  सध्या कोरोनाचे वातावरण आहे त्यामुळे त्यामधून घरातच ऑक्सीजन मिळणार आहे. यासाठी तुम्ही घरातच झाडे लावा त्यामुळे तुम्हला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकेल असा मोलाचा सल्ला ते यातून देत आहेत. त्यांचा असा मानस आहे की स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे तर ७५  हजार झाडे नागरिकांनी  लावावी.

- Advertisement -

त्यांनी लावलेल्या झाडांमध्ये अरेका प्लाम, लिली ख्रिसमस ट्री, मनी प्लांट चे बारा प्रकार,मोगरा,गुलाब, जास्मिन, कृष्णा कमळ त्याचे ८ प्रकार, ब्रम्ह कमळ,  ऑर्किड क्रोटन अशा विविध प्रकारची २७५ फुलं झाडं आहेत. तर भाज्या चे प्रकार १२० आहेत. गुलाबाचे २८ प्रकार आहेत.  त्यात विविध रंग आहेत. रबर ट्री देखील आहे. घरात अशा प्रकारची झाडं लावल्याने कार्बन डायऑक्साइड कमी होतो आणि ऑक्सीजन तयार होतो. तसचं ग्रीन वातावरण तयार होते. ही झाडे त्यांनी कोणत्याही प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा पॉट मध्ये न लावता कोको पॉट म्हणजे नारळाच्या झाडा पासून तयार केलेल्या पॉट मध्ये लावली आहेत.  त्यांची लागवड हे पर्यावरणपूरक पद्धतीने केली आहे. इथे प्लास्टिक चा वापर सुध्दा टाळला आहे . जेणे करून पूर्ण पर्यावरण पूरक अशी संकल्पना कट्टी यांची आहे. असे कट्टी यांनी घरभर तीन मजले किचन व बेडरूम मध्ये झाडांचे संगोपन केले आहे. ज्यांना कोणाला झाडे लावायची आहेत किंवा झाडांविषयी माहिती पाहिजे असल्याचा कट्टी नक्कीच संपर्क साधा ते मोफत मदत करतील असे कट्टी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -