Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाणे जिल्ह्यात आढळले कोरोनाचे ३६९ रुग्ण

ठाणे जिल्ह्यात आढळले कोरोनाचे ३६९ रुग्ण

कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होती. परंतु बुधवारी मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढताना दिसू लागली आहे. बुधवारी जिल्ह्यात ३६९ रुग्ण आढळल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दोन लाख ५८ हजार ६९४ इतकी नोंदवली गेली आहे. तर, दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २१४ झाली आहे.

ठाणे शहर परिसरात ११७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६० हजार ४१२ झाली आहे. शहरात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३७५ झाली. कल्याण – डोंबिवलीत १२८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. येथे आता आता ६१ हजार ४१२ रुग्ण बाधीत असून एक हजार १८२ मृत्यूची नोंंद आहे. नवी मुंबई मध्ये ७९ रुग्ण सापडले असून येथे आता ५४ हजार १८५ रुग्ण बाधीत असून एक हजार ११०२ मृत्यूची नोंंद आहे.

- Advertisement -

उल्हासनगरमध्ये ४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७७४ झाली. तर, ३६९ मृतांची नोंद आहे. भिवंडीत आजही एकही बाधीत नसून एकही मृत्यू नाही. त्यामुळे बाधीत सहा हजार ७४५ असून मृतांची संख्या ३५४ कायम आहे. मीरा भाईंदरमध्ये २६ रुग्ण आढळले असून शून्य मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या २६ हजार ६२३ असून मृतांची संख्या ८०१ आहे.

अंबरनाथमध्ये ३ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. येथे बाधीत आठ हजार ६६३ असून मृत्यू ३१४ आहेत. बदलापूरमध्ये १० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ६०१ झाले आहेत, तर मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये २ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता बाधीत १९ हजार ३४५ आणि आतापर्यंत ५९२ मृत्यू आहेत.

- Advertisement -