४८ लाखांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाची कामगिरी

महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेली भारतीय विदेशी मद्य व बियर असा ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने जप्त केला असून यामध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे ३३० बॉक्स व बियरचे ७० बॉक्स, लाकडी भुशाच्या २०० गोण्या, दोन मोबाईल व एक टेम्पोचा समावेश आहे. ही कारवाई बुधवारी पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामधील खाणवेल उधवा रोड येथे केली. यावेळी उत्तरप्रदेशच्या सुरेशकुमार दयाराम यादव आणि गुजरात येथील शैलेश मोहनभाई वर्मा या दोघांना अटक केली.

पालघर जिल्ह्यातीलखानवेल-उधवा रोडवरुन परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती निरीक्षक आनंदा कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार उधवा पोलीस चौकीसमोर पाळत ठेवली असता एका टेम्पोची संशयास्पद हालचालीवरून तपासणी केली, त्या टेम्पोमध्ये मोठया प्रमाणात फॉर सेल इन यु.टी.दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासीत प्रदेशामध्ये विक्रीकरीता असलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे ३३० बॉक्स व बियरचे ७० बॉक्स मिळून आले आणि त्यावेळी दोघांना अटक केली. व  एकूण ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे तसेच जवान नारायण जानकर, केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाठ, वैभव वामन, जी. के. खंडागळे व जवान नि. वाहनचालक राजेश झापडे या पथकाने केली. दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे पुढील तपास करत आहेत.