घरठाणेठाणे जिल्ह्यात ४९ दरड प्रवण क्षेत्र

ठाणे जिल्ह्यात ४९ दरड प्रवण क्षेत्र

Subscribe

ठामपात सर्वाधिक १४ दरड प्रवणक्षेत्र

 ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगर टेकड्यांनी व्यापलेला आहे. त्यात या डोंगरांवर आणि टेकड्यांवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. मात्र, हेच अतिक्रमण आता नागरिकांच्या मुळावर उठले आहे. डोंगर माथ्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे माती भूसभुशीत होवून दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्याने त्यामध्ये जीवितहानी देखील होत असते. हीच जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ ठिकाणेही दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
 ठाणे जिल्ह्यातील सात महापलिका क्षेत्रांसह ग्रामीण क्षेत्र आणि नगरपालिका हद्दीत पावसाळ्याच्या काळात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यात दुसरीकडे डोंगर माथ्यांच्या भागत राहणाऱ्या नागरिकांना पवसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका अधिक असल्याचे दिसून येते. त्यानुसार ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील महापलिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील दरड प्रवण क्षेत्रांची माहिती घेवून त्याची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात येत असतात. तसेच या पाहणीत तेथील आताची परिस्थिती, तेथील लोकसंख्या, दुर्घटना घडल्यास वेळप्रसंगी नागरिकांना स्थलांतरीत करण्याकरता व्यवस्था करणे आदींचा आढावा घेवून त्यासंदर्भातील उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनासह नगरपालिका प्रशासन आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींना देण्यात आली आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात दरम्यान, दरड कोसळून होणारी दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ ठिकाणी हि दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यात डोंगरमाथ्यावर  धोकादायक ठिकाणी आशा वस्त्या जेव्हा उभ्या राहतात .तेव्हाच दक्षता घेणे गरजेचे आहे. तेव्हा केलेल्या दुर्लक्षपायी मोठी किंमत मोजावी लागते. परिणामी त्याला वेळीच अटकाव घालणे गरजेचे आहे. तसेच दरड कोसळल्यास काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचना देखील संबंधित यंत्रांना देण्यात आल्या आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -