घरठाणेबर्ड फ्लूची भीती कायम ठाणे शहरात तिसर्‍या दिवशी ५२ पक्षी मृत

बर्ड फ्लूची भीती कायम ठाणे शहरात तिसर्‍या दिवशी ५२ पक्षी मृत

Subscribe

उरणमध्ये १५० कोंबड्या दगावल्या

महाराष्ट्रात बर्ड फ्लूने प्रवेश केला असताना तालुक्यातील रायगडमधील जासई ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी १५० कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. पशुसंवर्धन खात्याने मृत कोंबड्यांचा पंचनामा करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तालुक्यात बर्ड फ्लूने प्रवेश तर केला नाही ना, या शक्यतेने नागरिक भयभीत झाले आहेत. तर ठाणे शहरात विविध पक्ष्यांच्या मृत्यूचे शतक झाले असून तिसर्‍या दिवशी 52 पक्षी दगावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप घरत यांनी उदरनिर्वाहासाठी कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला आहे. रविवार ते सोमवारी त्यांच्या कोंबड्यांपैकी १५० कोंबड्या अचानक मृत अवस्थेत आढळून आल्या. राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले असताना अचानक इतक्या मोठ्या संख्येने कोंबड्या दगावल्याने या घटनेने भयभीत झालेल्या घरत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून याची माहिती पशुसंवर्धन अधिकार्‍यांना दिली. अधिकार्‍यांनी तातडीने तात्काळ मृत कोंबड्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली. परंतु या घटनेची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बर्ड फ्लूच्या शक्यतेने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

ठाण्यात १२१ पक्ष्यांचा मृत्यू
ठाणे शहरात गेल्या तीन दिवसात विविध121 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. शहराच्या वेगवेगळ्या भागात मृतावस्थेत आढळलेले पक्षी हे विविध जातीतील आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी 16, दुसर्‍या दिवशी 28, तिसर्‍या दिवशी 52 तर सोमवारपर्यंत एकूण 121 पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाल्याने पक्ष्यांवर एकप्रकारे संक्रांत ओढवली आहे. ठाणे महापालिकेने एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला असून कोणताही पक्षी मृत्यू आढळल्यास नागरिकांनी त्वरित दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

ठाणे शहरात तीन दिवसात 121 पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्या पक्ष्यांचे नमुने घेतले आहे. त्या पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. जर का पक्षी मृतावस्थेत आढळल्यास तात्काळ महापालिकेशी संपर्क करावा.-
-संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -