घरठाणेThane wall collapse : ठाण्यात ५५ फूट भिंत कोसळली; ४ कारसह सात...

Thane wall collapse : ठाण्यात ५५ फूट भिंत कोसळली; ४ कारसह सात दुचाकींचे नुकसान

Subscribe

ठाणे शहरातील मध्यभागी असलेल्या मल्हार सिनेमागृहासमोरील राजदीप सोसायटीची ५० ते ५५ फूट भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे ७ मोटारसायकल, ४ चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवानं ठाण्यातील घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

- Advertisement -

मात्र एकूण ११ वाहनांवर भिंतीचा मलबा पडल्याने त्या वाहनांचे मोठे नुकसान झालेय. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र ही भिंत धोकादायक स्थितीत असल्याचे ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ही आपत्ती विभागाने सांगितले आहे.


भाजपाकडून स्क्रीप्ट लिहून जाते, नाहीतर अमित ठाकरे… महापौर किशोरी पेडणेकर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -