घरठाणेठाणे पोलीस दलातील ७७ पोलीस कोरोनाबाधित

ठाणे पोलीस दलातील ७७ पोलीस कोरोनाबाधित

Subscribe

ठाणे पोलीस दलात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असून एकाच दिवसात पोलीस मुख्यालयासह विशेष शाखेत ५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. ते घरीच उपचार घेत आहेत. ठाणे पोलीस दलात कोरोनाबाधितांची संख्या ७७ झाली असून १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्षभरात ठाणे पोलीस दलात ३६ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा शिरकाव पोलीस दलात देखील झाला आहे. मागील दोन दिवसात पोलीस मुख्यालयातील ३ पोलीस शिपायांसह ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या पाचही जणांवर घरी उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मागील काही आठवड्यात ठाणे पोलीस दलात ७७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरितांवर घरी उपचार सुरू आहेत. मागील वर्षभरात ठाणे पोलीस दलात २३०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती त्यापैकी २१२६ जण बरे झाले आहेत. तसेच गेल्या वर्षभरात ३६ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -