घरठाणेठामपा हद्दीत 793 खड्डे

ठामपा हद्दीत 793 खड्डे

Subscribe

सर्वाधिक 284 खड्डे दिव्यात, आतापर्यंत 620 खड्डे बुजवल्याचा ठामपा दावा

जुलै महिन्यात सातत्याने सुरु असलेल्या मुसळधार पावसात ठाणे महापालिका हद्दीत 793 खड्डे पडल्याची माहिती समोर आली. हे खड्डे 1796.7 चौरस मीटर क्षेत्रफळाचे असून त्यातील 620 खड्डे बुजविण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ 1500 चौरस मीटर एवढे आहे. तर 163 खड्डे बुजविण्याचे शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने सूत्रांनी दिली. 793 खड्डयांपैकी सर्वाधिक 284 खड्डे हे एकमेव दिवा प्रभाग समितीत आहेत.

तर शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने बर्‍यापैकी उंसत घेतल्याने महापालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून हे खड्डे बुजविताना प्रामुख्याने कोल्डमिक्सच्या वापर केला जात आहे. खड्डे बुजविण्यासाठी सुमारे 2.50 कोटींची पालिकेकडून तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात खड्ड्यांवरून महापालिकेवर नेहमी ताशेरे ओढले जातात. मात्र यंदा महापालिकेने सावध पाऊले टाकत, एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणाची एक बैठक घेऊन त्यांना त्यांच्या मालकीच्या रस्त्याची जाणीव करून दिली. एवढेच नाहीतर त्या रस्त्यांवर पडणारे खड्डे तुम्हीचे तुम्हीच बुजवायचे याची आठवण वजा सुचना केल्या होत्या. त्याच्यानंतर ही ठाणे महापालिका हद्दीत विविध भागात खड्डे पडल्याची बाब समोर आली आहे. मात्र महापालिकेने त्यांच्या हद्दीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. ठामपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांचा सर्व्हे केला.

यामध्ये कोणत्या रस्त्यावर किती खड्डे पडले आहेत, किंवा कोणत्या प्रभाग समितीत खड्डे आहेत, याची माहिती घेण्यात आल्यावर यंदा महापालिका हद्दीत 793 खड्डे पडल्याची बाब पुढे आली आहे. ते खड्डे ही बुजविण्यास सुरूवात करून 620 खड्डे बुजवले गेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

या तत्रंज्ञानाचा वापर
डब्ल्युबीएम, कोल्ड मिक्स, पेवर ब्लॉक, काँक्रीटीकरण, डांबरीकरण आदी पध्दतीने हे खड्डे बुजविण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

पडलेल्या आणि भरलेल्या खड्ड्यांचा तक्ता

प्रभाग समिती पडलेले खड्डे/भरलेले खड्डे/ शिल्लक खड्डे
नौपाडा कोपरी 54/ 42/12
उथळसर 76/ 70/06
कळवा 52/38/14
मुंब्रा 36/21/15
वागळे 72/42/30
वर्तकनगर 115/103/12
दिवा 284/235/39
माजीवडा मानपाडा 61/43/18
लोकमान्य सावरकर 43/26/17
एकूण 793/620/163

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -