घरठाणेपोलिसांवर हल्ला करणार्‍या ८ इराणी महिलांवर मोक्का कायद्याने गुन्हा

पोलिसांवर हल्ला करणार्‍या ८ इराणी महिलांवर मोक्का कायद्याने गुन्हा

Subscribe

आंबिवलीतील इराणी वस्तीत नेहमीच चोरट्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात अग्रभागी असलेल्या आठ इराणी सराईत हल्लेखोर महिलांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याने (मोक्का) गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला. याशिवाय अंधेरी पोलिसांवर हल्ला करणार्‍या इतर ३५ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली.

मुंबईतील अंधेरी भागात चोरी केलेल्या एका चोरट्याला पकडण्यासाठी अंधेरी पोलिसांचे एक पथक बुधवारी रात्री आंबिवलीतील इराणी वस्तीत आले होते. यावेळी तीन चोरट्यांच्या घराला वेढा घातल्यानंतर चोट्याच्या कुटुंबीयांना ओरडा करून वस्तीला उठवले. वस्तीमधील इराणी रहिवाशांनी अंधेरी पोलिसांवर दगडफेक करून त्यांना वस्तीमधून पळून लावले. या झटापटीत पोलिसांनी तीन आरोपींना पकडले होते. परंतु, रहिवाशांनी दगडांचा तुफान मारा पोलिसांवर केल्याने बचावाची भूमिका घेताना पोलिसांच्या तावडीतून दोन चोरटे पळून गेले. एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
या हल्ल्यात १० हून अधिक अंधेरी पोलीस जखमी झाले. एका पोलिसाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी केलेल्या ध्वनीदृश्य प्रणालीतून हल्लेखोरांची ओळख पटवून खडकपाडा पोलिसांनी हवालदार राहुल शिंदे यांच्या तक्रारीवरून ३५ हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले. अशा हल्ल्याच्यावेळी वस्तीमधील आठ महिला नेहमीच हल्ला करण्यात आघाडीवर असतात. अशा आठ सराईत हल्लेखोर महिलांवर मोक्का कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत. हल्लेखोर फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयारी केली आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -