घरक्राइमठाण्यात ८० लाखाची फसवणूक; बंटी बबली फरार, ४५ जणांना लावला चुना

ठाण्यात ८० लाखाची फसवणूक; बंटी बबली फरार, ४५ जणांना लावला चुना

Subscribe

हा प्रकार ठाण्यातील नौपाडा परिसरात मंगळवारी उघडकीस आला असून नौपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल

जादा व्याजाचे आमिष दाखवून तब्बल ४५ जणांची ८० लाख रुपयाची फसवणूक करून पळून गेलेल्या बंटी बबली यांचा नौपाडा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यात तक्रारदारांची संख्या तसेच फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. हा प्रकार ठाण्यातील नौपाडा परिसरात मंगळवारी उघडकीस आला असून नौपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मनोज पवार (४५) आणि मोनिका पवार (४०) असे फसवणुक करणाऱ्या बंटी बबलीचे नावे आहेत. दोघे पतिपत्नी असून नौपाड्यातील गौतमवाडी बी कॅबिन ठाणे या ठिकाणी राहण्यास होते. हे दाम्पत्य मागील काही वर्षांपासून चिटफंड चालवत होते. दरम्यान त्यांनी गुतवणूकदारांना जादा व्याज देण्याचे आमिष दाखवल्यामुळे अनेकांनी अधिक व्याजाच्या लालसेने लाखो रुपये गुंतवले होते. त्यापैकी अनेक गुतवणूकदारांना या दाम्पत्याने व्याजासह रक्कम परतवली होती.गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून या दोघांनी गुतवणूकदाराना मोठी रक्कम गुतवण्यास सांगितले. जादा व्याजदराजाच्या लालसेने शेकडो गुतवणूकदारानी लाखो रुपये गुंतवल्यानंतर ज्या वेळेस पैसांचा परतावा करण्याची वेळ या दाम्पत्यावर आली त्यावेळी या दाम्पत्याने घराला कुलूप लावून पोबारा केला.

- Advertisement -

हा प्रकार गुंतवणूकदारांच्या लक्षात येताच त्यांनी मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ४५ गुंतवणूकदारानी मंगळवारी रात्री आपल्या तक्रारी दाखल केल्या असून या सर्वांचे मिळून ८० लाख ३५ हजार रुपयाची फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहे. मात्र गुंतवणूकदारांची संख्या तसेच फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.महाडिक यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. याप्रकरणी मनोज पवार आणि मोनिका पवार याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.


राज्यात रेस्टॉरंट्स, बार उघडण्याच्या नवीन वेळा जाहीर; शासन आदेश जारी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -