घरठाणेगौरी गणपतीसाठी ठाण्यातून एसटीच्या ८०० जादा गाड्या

गौरी गणपतीसाठी ठाण्यातून एसटीच्या ८०० जादा गाड्या

Subscribe

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्य परिवहन (ठाणे) विभागाकडून गौरी गणपतीसाठी एसटीच्या जादा बसेस सोडण्याचे नियोजन केलेले आहे. या ८०० जादा गाड्या ६ ते १० सप्टेंबर दरम्यान कोकणाच्या दिशेने धावणार आहेत. तर कोकणातून परतीचा प्रवास हा १४ ते १६ सप्टेंबर असा असणार असून विभागातील एसटी स्थानकावरील संगणकीय आरक्षण खिडक्या या १५ ते १९ जुलै या कालावधीत २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाने दिली.

यावर्षीच्या गौरी-गणपतीसाठी ८०० जादा गाड्या ६ ते १० सप्टेंबर २०२१ या कालावधीत चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग अशा मार्गावर ठाणे विभागातील बोरीवली, भाईंदर, ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी या बसस्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. तरी उपनगरातील कोकणवासी गणेश भक्त व कोकण गणेश मंडळे यांनी रा.प.ठाणे विभागातील नजिकच्या आगाराशी संपर्क साधण्यात यावा व सुरक्षित प्रवासाकरिता एस.टी बसनेच प्रवास करावा, असे आवाहन ठाणे विभागाने केले आहे.

- Advertisement -

आरक्षण ६० दिवस आधी
कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे आगाऊ संगणकीय आरक्षणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. संगणकीय आरक्षणचा कालावधी हा ६० दिवस आधी व ग्रुप बुकिंग कालावधी हा ६० दिवस आधी करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच विभागातील स्थानकावरील संगणकीय आरक्षण खिडक्या या १५ ते १९ जुलै २०२१ या कालावधीत २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -