घरठाणेभिवंडी पालिकेचा 897 कोटी 69 लाख 63 हजारांचा अर्थसंकल्प सादर

भिवंडी पालिकेचा 897 कोटी 69 लाख 63 हजारांचा अर्थसंकल्प सादर

Subscribe

भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षाचा 11 कोटी 62 लाख शिल्लक दर्शविणारा 897 कोटी 69 लाख 63 हजार रुपयांचा अर्थसंकल्प विभाग प्रमुखांच्या प्रशासकीय समिती समोर सन 2022-23 चे सुधारीत व सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,मुख्य लेख व वित्त अधिकारी किरण तायडे,उपायुक्त मुख्यालय दीपक पुजारी,उपायुक्त दीपक झिंजाड,उपायुक्त प्रणाली घोंगे, साहेब आयुक्त (आरोग्य) प्रीती गाडे व सर्व विभाग प्रमुख, पालिका अधिकारी उपस्थित होते. डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधी करीता आवश्यक त्या लेखाशिर्षात पुनर्विनियोजन करून,सन 2022-23 चे सुधारीत 887 कोटी 64 लाख 20 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.तर 2023-24 मध्ये महानगरपालिकेची अंदाजित प्रारंभिक शिल्लक रु.17 कोटी 16 लाख 85 हजार अपेक्षित धरून एकुण उत्पन्न प्रारंभिक शिल्लकेसह 897 कोटी 69 लाख 63 हजार अपेक्षित धरून 11 कोटी 62 लाख शिल्लकेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात हाती घेण्याचे प्रकल्प
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात विशेष करून मलनिःस्सारण प्रकल्पासाठी आवश्यक एसटीपी प्लँट कार्यान्वीत करणे,शहरात स्मशानभुमी मध्ये गॅस दाहीनीची सुविधा उपलब्ध करून देणे,पालिकेचा 30 खाटांचा बीजीपी दवाखाना कार्यान्वीत करणे,शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाची निगा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे,सिमेंट कॉक्रिट रोड तयार करणे,अटल आनंद घन वन प्रकल्प, कै.परशुराम धोंडु टावरे स्टेडीअम क्रिडा संकुलन सुशोभिकरण करणे,मनपा शाळा इमारती बळकटीकरण करणे व बेंचेस पुरविणे,स्व. मिनाताई ठाकरे नाट्यगृहाचे नुतनीकरण करणे,
पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लवकरच पाण्याच्या टाक्या वापरात आणण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील छतावर 100 के डब्लु.पी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प पुर्ण करण्यात आलेला असुन,त्या माध्यमातून सरासरी दरमहा 11 हजार युनिट वीज तयार करणेत येत आहे .त्यामुळे दरमहा वीज बिलात दरमहा 1 लाख 15 हजाराची बचत होत आहे.त्यामुळे पुढील आर्थिक वर्षामध्ये इतर ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे कामी तरतुद करणेत आलेली असुन अपारंपारीक ऊर्जा स्त्रोतापासून वीज निर्मिती व पर्यावरण रक्षणावर भर दिला जाणार आहे. तसेच महानगरपालिकेचे महसुली उत्पन्ना पैकी शासन निर्णयाप्रमाणे 2 टक्के म्हणजेच 9 कोटी 70 लाख 88 हजार इतकी रक्कम नगरसेवक निधी म्हणून तरतूद करणेत आली आहे. त्याचप्रमाणे महिला व बाल कल्याण, दुर्बल घटक (पी) अर्थसंकल्प दिव्यांग कल्याण या लेखाशिर्षाकरीता शासन निर्णयाप्रमाणे मनपाच्या महसूली उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता उर्वरीत उत्पन्नाच्या 5 टक्के तरतूद रक्कम 32 कोटी 88 लाख रुपयांचा निधी स्वतंत्र्यरीत्या राखून ठेवण्यात येणार आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -