अज्ञाताकडून ९० कोटी ४३ लाख ७० हजार १९४ रुपयांच्या जीएसटीची लूट

तक्रार बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल

संगणक प्रणालीवर एका अनोळखी इसमाने फेरफार करीत ईमेल आयडी वरील मोबाईल नंबरचे शेवटच्या चार नंबरने जी मेल आयडी तयार केला. त्याला फिर्यादीच्या असलेल्या जीएसटी क्रमांकाला लिंक करीत ५०२ कोटी ४२ लाख ७८ हजार ८५६  असे आर्थिक व्यवहार करून व्यवसायाची जीएसटी रक्कम ९० कोटी ४३ लाख ७० हजार १९४ रुपयांची राज्य सरकारला न भरता तक्रारदार आणि सरकारची फसवणूक केली. अशी तक्रार बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत किशन चेतन पोपट हे व्यवसायिक राहतात.  त्यांचे श्री कृष्णा इन्वेस्टमेंट या फर्मच्या नावे एंजल ब्रोकिंग या कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊन डिमॅट उघडण्याचा व्यवसाय आहे. संगणकावर व्यवसायाकरिता जीएसटी क्रमांक काढला असून त्यास लिंक म्हणून पोपट यांचा मोबाईल नंबर ई-मेल वर टाकण्यात आला होता.
परंतु अनोळखी इसमाने जीएसटी पोर्टलमध्ये व्यवसायिक पोपट यांचे फर्म प्लास्टिक पिशवी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे भासवून संगणक प्रणालीमध्ये फेरफार करून स्वतःचे मोबाईल नंबर ज्याचे शेवटचा अंक २८७९ असे आहेत. तसेच  ईमेल आयडी त्याची शेवटची अक्षरे असल्याचा नवीन ईमेल आयडी बनवला.
त्यातून तक्रारदाराच्या संमतीशिवाय फिर्यादीच्या फर्मचे जीएसटी क्रमांकाला लिंक करून श्रीकृष्ण इन्वेस्टमेंट या नावे काढलेल्या जीएसटीद्वारे जीएसटी क्रमांक काढल्यापासून नोव्हेंबर २०२० पासून २५ जून २०२१ पर्यंत ५०२ कोटी ४२ लाख ७८ हजार ८५६ आर्थिक व्यवहार केला होता. या व्यवहारामध्ये अज्ञाताने ९० कोटी ४३ लाख ७० हजार १९४ रुपयांचा जीएसटी कर न भरता  राज्य शासनाची आणि व्यवसायिक किशन पोपट यांची आर्थिक फसवणूक केली. ही तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.  आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत काटकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.