घरठाणेठाणे जिल्ह्यात रविवारी ९ हजार  कोरोना रुग्ण

ठाणे जिल्ह्यात रविवारी ९ हजार  कोरोना रुग्ण

Subscribe

तिघांचा मृत्यू

गेल्या काही दिवसात ज्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत होता. त्यामध्ये काही प्रमाणात घट होताना दिसत असली तरी रविवारी कोरोना रुग्णांची संख्या ही रविवारी  ९ हजारांच्या घरात पोहोचलेली आहे. नवीमुंबई आणि ठाणे येथील रुग्ण संख्येत अवघा ३ रुग्णांचा फरक आहे. तर दगावलेल्या तिघांपैकी दोन जण अंबरनाथ येथील आहेत. वाढत्या रुग्ण संख्येने एकूण रुग्ण संख्याही ६ लाख २१ हजार झाली आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३३ हजार १२६ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

रविवारी जिल्ह्यातील नवीमुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक २ हजार ६२९ रुग्ण आढळून आल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९ हजार १५३ झाली आहे. तर ठाण्यात २ हजार ६२६ रुग्णांची नोंदणी झाल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १० हजार ८६ इतकी झाली आहे. केडीएमसीत एक हजार ६७२ रुग्ण सापडले असून ५ हजार  २५८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उल्हास नगर येथे २६२, भिवंडीत १२३, मीरा-भाईंदर मध्ये ९१९,अंबरनाथ येथे २५१,कुळगाव बदलापूर येथे १८७, ठाणे ग्रामीण मध्ये ३९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच अंबरनाथ येथे दोन तर मीरा भाईंदर येथे एकाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

माजीवडा मानपाडा हा कोरोनाचा केंद्र बिंदू
ठामपामध्ये शनिवारच्या तुलनेत रविवारी तिनशेने रुग्ण संख्येत घट झाली आहे. मात्र ठामपा मध्ये माजीवडा मानपाडा हा कोरोनाचा केंद्र बिंदू ठरत आहे. येथे सर्वाधिक १,०६५ रुग्ण रविवारी नोंदवले गेले आहेत. वर्तकनगर ४०१, लोकमान्य-सावरकर नगर १७९,नौपाडा- कोपरी १९९, उथळसर ३०६, वागळे इस्टेट १३७,कळवा १५९, मुंब्रा ४०, दिवा ७५ , इतर ठिकाणी ६५ असे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती ठामपाने दिली.

ठाणे जिल्ह्यात रविवारी ६ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार रात्री रविवारी आठपर्यंत ६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी १४ लाख ५८ हजार ७५२ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६५ लाख ५० हजार ५९ नागरिकांना तर ४९ लाख ८ हजार ६९३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ११७ सत्र आयोजित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -