घरठाणेठाण्यात इमारतीमध्ये लागलेल्या आगीत १० मीटर बॉक्स जळून खाक

ठाण्यात इमारतीमध्ये लागलेल्या आगीत १० मीटर बॉक्स जळून खाक

Subscribe

ठाणे – ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा क्रमांक -१, येथे नाग दर्शन अपार्टमेंट या इमारतीच्या तळ मजल्यावर असेलल्या मीटर बॉक्स रूममध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. १०-मीटर बॉक्स पूर्णपणे जाळले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

हेही वाचा – ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार बंद

- Advertisement -

लोकमान्य नगर येथील तळ अधिक चार मजली नाग दर्शन अपार्टमेंट या इमारतीमधील मीटर बॉक्सला आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. महावितरणचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत केला. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसली तरी मीटर बॉक्स रूम मधील एकूण १०-मीटर बॉक्स पूर्णपणे जळाले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -