कल्याण कुष्णी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये एका फूल पान विक्रेत्या महिलेची 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली. ज्या परिसरात कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नशेखोरांचा वावर असतो. त्यामुळे घाबरलेल्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बाजारपेठ पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. डॉग स्कॉडही आणला गेला. अथक 18 तासांच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षाची मुलगी एका महिलेकडे मुलगी सापडल्याने पोलिसांच्या अथक प्रयत्नाना यश प्राप्त झाले.
कल्याण पश्चिमेतील जोशी बागेत राहणारी सुनिता माळी 28 वर्षीय महिला फुले पाने विकण्याचा व्यवसाय करतात. त्यानिमित्ताने कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये आली असता तिच्यासोबत तिची लहान मुलगी अनन्या ही देखील तिच्या सोबत आली होती.
मार्केटमधील शेतकरी कट्टा येथून चार वर्षाची अनन्या अचानक गायब झाली. कोणी तरी संशयित व्यक्तीने तिला घेऊन गेल्याचा संशय आईला आला. या प्रकरणात कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरमी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तीन पथके तयार केली. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल पवार, पोलीस निरिक्षक लक्ष्मण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी किरण वाघ, महिला पोलिस अधिकारी दीपाली वाघ, पोलीस उपनिरिक्षक संतोष भुंडेरे, अजिंक्य मोरे, यांचा पथकाने मुलीचा तपास सुरू केला. यासाठी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. जवळपास 18 तास पोलिसांची तीन पथके या मुलीचा शोध घेत होते. अखेर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस पंकज परदेशी यांना माहिती मिळाली की ही मुलगी एका महिलेकडे सुखरुप आहे. रात्री तीनच्या सुमारास पोलीस पथक त्या महिलेच्या घरी गेले. मुलगी इतत्र भटकत असताना त्या महिलेने तिला सुरक्षितेतेसाठी तिला घरी ठेवले असल्याचे सांगितले. चार वर्षाच्या अनन्या माळी हिला पोलिसानी तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या कर्तव्य दक्षेतेमुळे माय लेकीची काही तासात भेट झाली.