Eco friendly bappa Competition
घर ठाणे माळशेज घाटात बस-ट्रकची समोरा समोर धडक

माळशेज घाटात बस-ट्रकची समोरा समोर धडक

Subscribe

माळशेज घाट हा कायम मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याला सा़ईटपट्या नसल्याने व भरधाव वाहन चालक प्रवाशाच्या मृत्यूला कारण ठरत आहेत. माळशेज घाटात नगरहून कल्याण कडे येणारी बस घाट उतरत असता मुरबाडहून जून्नरकडे जाणारा ट्रकला समोरासमोर धडकली. माळशेज घाटातील सावर्णे वळणावर ही धडक झाली.
अपघातानंतर एस टी बस रस्त्याच्या कडेला उलटली. यामुळे पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधील 15 जखमींवर टोकावडे सरकारी दवाखाण्यात उपचार सुरू असून काहींना घरी सोडण्यात आले आहे. तर ट्रकचालक गंभीर जखमी असून दोन्ही वाहन भरधाव असल्याने हा अपघात घडल्याची माहिती या बस मधील प्रवासी आणि जखमी महिला मंदा फुलसुंदे(धसई ) गाव यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -