घरठाणेआरआरआर केंद्रांना नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद

आरआरआर केंद्रांना नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद

Subscribe

घरगुती कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या विविध वस्तूंच्या पुर्नवापर करीता अभियान

 केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने “मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” हे अभियान १५ मे  ते ५ जून  या ३ आठवड्यांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियांनातर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे प्रभागक्षेत्रांच्या स्तरावर १० आरआरआर केंद्रे उभारले असून त्याअंतर्गत घरगुती कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचा पुर्नवापर तसेच पुर्नवापर न करता येणाऱ्या वस्तू आणि साहित्यावर पुनर्प्रक्रिया केली जात आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्थापित केलेल्या १० आरआरआर केंद्रांवर कपडे, जुने चप्पल-बूट, जुनी पुस्तके, प्लास्टिकच्या वस्तू, जुनी खेळणी, दप्तरे इ. सारख्या वस्तू जमा करण्याबाबत महापालिकेने विविध माध्यमांद्वारे केलेल्या आवाहनाला नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. २० मे  रोजी प्रभागस्तरीय १० आरआरआर केंद्रांचे उद्घाटन पार पडल्यानंतर अवघ्या ६ दिवसांमध्ये नागरीकांनी घरगुती कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या ६१८ किलो वस्तू व साहित्य स्वयंस्फूर्तीने या केंद्रांवर जमा केले. यामध्ये सुस्थितीतील कपडे २४६ किलो, चप्पल व बूट १४३ किलो प्लास्टिकच्या पुर्नवापर योग्य वस्तु १२७ किलो, जुनी वापरण्यायोग्य पुस्तके १०२ किलो, जुनी खेळणी ३८ नग. दप्तरे २३ नग यांचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिमंडळ १ चे उपायुक्त धैर्यशील जाधव, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, सार्वजनिक आरोग्य अधिकारी ऑगस्टीन घुटे, सर्व प्रभाग क्षेत्रांचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, नागरिक संघटना एनजीओ, कचरावेचक सामाजिक संघटना, महिला बचत गट यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्यानंतर नागरिकांचे योगदान वाढीस लागले आहे. परिमंडळ १ व प्र. घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी यावेळी सांगितले की, महापालिकेने स्थापित केलेल्या सर्वच १० RRR केंद्रांवर नागरीकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरातील कचरा पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर करण्यासाठी नागरिकही पुढाकार घेत असल्याचे आशावादी चित्र निर्माण होत आहे. या आर आर आर सेंटर यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यास सदर केंद्र ही कायमस्वरूपी कार्यरत राहतील असे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -