घरठाणेमहिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Subscribe

उल्हासनगर शहराला लगत असलेल्या वडोल गावात एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी सहा जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. उल्हासनगर कॅम्प नंबर येथील वडोल गावात प्रिया पंकज पंडा ( मनिषा भगवान जाधव ) ही अनुसूचित जातीची महिला राहत आहे. जागेवरुन त्या गावातील अशोक म्हात्रे आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला होता.

करण न्याय प्रविष्ठ असताना गावातील गाव गुंड त्या महिलेला त्रास देत होते. दरम्यान २१ मे रोजी महिला आपल्या दुकानात असताना अशोक पुंडलिक म्हात्रे, शरद दामु म्हात्रे, मनोज गणपत म्हात्रे, सचिन उर्फ पिंटु गणपत म्हात्रे, मुकेश शंकर म्हात्रे व आश्विन उर्फ आशा चिंगा म्हात्रे हे दुकानाजवळ येवून त्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत दुकानाच्या बाहेर भिंतीवर लावलेला जयभिम महिला बचत गटाचा बोर्ड तोडून टाकला. या महिलेलागावा बाहेर काढा असे बोलून जातीवर शिवीगाळ करत तिला मारहाण देखिल केली. या बाबत प्रिया पंडा यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी अशोक म्हात्रे , शरद म्हात्रे, मनोज म्हात्रे , सचिन म्हात्रे , मुकेश म्हात्रे , आणि अश्विन म्हात्रे या सहा ही जणांविरुध्द अनुसूचित जाती जमाती कलमा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -